कराड दक्षिण मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
भारतीय जनता पार्टीचे सातारा लोकसभा प्रभारी तथा कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांचा मंगळवार, दि. 28 मार्च रोजी वाढदिवस साजरा होत आहे. यानिमित्त 27 मार्च ते 9 एप्रिलपर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. 28) डॉ. अतुलबाबा भोसले हे सकाळी 8 पासून रेठरे बुद्रुक इंजिन पाणंद येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असून नागरिकांनी हार, तुरे, बुके न आणता शालेपयोगी साहित्य शुभेच्छा स्वरूपात आणावे, असे आवाहन वाढदिवस संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कराड दक्षिण मतदारसंघात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवार, दि. 27 मार्च रोजी शेरे येथे सायंकाळी 7 वाजता प्रा. श्रीधर साळुंखे यांचे व्याख्यान, 28 मार्च रोजी सकाळी 9 वाजता रिमांड होम येथे भोजन वाटप, सकाळी 9.30 वाजता कराड उपजिल्हा रुग्णालय आणि कोळे येथील जिजाऊ अनाथाश्रमात फळे व खाऊ वाटप, नेर्ले येथे वृद्धाश्रमात मध्यान्ह व सायंकाळ भोजन वाटप, तसेच नांदगाव येथे सकाळी 10.30 वाजता सर्वरोग निदान व दंत चिकित्सा शिबीर आणि रेठरे बुद्रुक येथे सायंकाळी 7 वाजता गणेश शिंदे यांचे ‘जीवन सुंदर आहे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

बुधवारी 29 मार्च रोजी गोंदी येथे सकाळी 10 वाजता ठेव पावती वितरण समारंभ व अल्पदरात कृषी साहित्य वाटप, सायंकाळी 5 वाजता मलकापूर येथे भव्य बैलगाडी शर्यती, सायंकाळी 6 वाजता नांदगाव येथे स्नेहमेळावा, रेठरे बुद्रुक येथे सायंकाळी 7 वाजता ‘खेळ पैठणीचा’, तसेच चचेगाव येथे सायंकाळी 8 रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

गुरुवारी 30 मार्च रोजी कार्वे येथे सकाळी 10 वाजता भव्य रक्तदान शिबिर, रेठरे बुद्रुक येथे सकाळी 10 वाजता प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा, कोडोली येथे सकाळी 11 वाजता महिला सक्षमीकरण व बचत गट मार्गदर्शन कार्यक्रम, कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सायंकाळी 7 वाजता जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा, 31 मार्च रोजी कराड येथे वेणूताई चव्हाण सभागृहात आयुष्यमान भारत स्मार्ट कार्ड वाटप व आशा सेविका यांचा सन्मान, मलकापूर येथे सायंकाळी 4 वाजता सिनेअभिनेत्री डॉ. भाग्यश्री शिंदे यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम, तसेच ओंड येथे दुपारी 2 वाजता भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

सोमवारी दि. 3 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता कराड येथील प्रीतिसंगम घाटावर ग. दि. माडगूळकर यांचे ‘गीतरामायण’, 5 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता घोणशी येथे भव्य बैलगाडी शर्यती, 6 एप्रिल रोजी रेठरे खुर्द येथे सायंकाळी 7 वाजता क्रिकेट स्पर्धा, 8 एप्रिलला सैदापुर येथे सकाळी 10 वाजता शालेय साहित्य व फळे वाटप, 9 एप्रिल रोजी सैदापुर येथील समर्थ मल्टिपर्पज हॉलमध्ये दुपारी 2 वाजता ‘खेळ पैठणीचा’ व सायंकाळी 8 वाजता महिलांचा फॅशन शो असे विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, असे संयोजन समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे.

बैलगाडी शर्यतीसह होणार भव्य मॅरेथॉन स्पर्धा

शनिवारी 1 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता कोयना वसाहत येथे नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू तपासणी शिबीर, वारुंजी येथे सायंकाळी 5 वाजता भव्य बैलगाडी शर्यती व कराड येथील प्रीतिसंगम घाटावर सायंकाळी 6 वाजता ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम, रविवारी 2 एप्रिल रोजी कराड शिवाजी विद्यालय आवारात सकाळी 6 वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धा, सकाळी 11 वाजता आटके टप्पा येथील विराज मल्टिपर्पज हॉलमध्ये कृष्णा बँकेचे खातेदार, उद्योजक व व्यावसायिकांचा मार्गदर्शन मेळावा आणि सायंकाळी 6.30 वाजता कराड येथील प्रीतिसंगम घाटावर ‘भूपाळी ते भैरवी’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.