Sunday, May 28, 2023

कराडच्या तहसील कार्यालयातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात; फेरफार उतारा नकल देण्यासाठी मागितली लाच

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

फेरफार उतारा नकल देणे करता तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षापाल याने आठशे रूपये लाचेची मागणी करून तीनशे रूपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अभिलेख कक्षापाल याला रंगेहात पकडले. महेश्‍वर नारायण बडेकर (अभिलेख कक्षापाल (रेकॉर्ड किपर), तहसील कार्यालय कराड, वर्ग 3, रा. शिवशक्ती निवास, शास्त्रीनगर, रिमांड होमच्या पाठीमागे, मलकापूर) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार यांनी फेरफार उतारा नकल हवा होता. त्यासाठी अभिलेख कक्षापाल महेश्‍वर बडेकर याने तक्रारदार यांच्याकडे 800 रूपये लाचेची मागणी केली होती. सोमवारी बडेकर याने तक्रारदार यांचेकडून 500 रूपये स्विकारले होते. उरलेले रक्कम मंगळवार दि. 23 फेब्रुवारी रोजी घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने बडेकर यांना रंगेहात पकडले.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के, पोलीस नाईक विनोद राजे, पोलीस हवालदार संभाजी काटकर, निलेश येवले यांनी केली.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा ग्रुप जाॅईन करा
Click Here to Join WhatsApp Group