कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलास काका पाटील-उंडाळकर गटाला धक्का बसला आहे. दहा वर्षानंतर नांदगाव येथे सत्तांतर झाले असून भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय प्राप्त झाला आहे.
नांदगाव येथे सुकरे गुरुजी, पै. दिलीप पाटील, पै. हंबीरराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेलने सहा जागा जिंकल्या आहेत. नांदगाव ग्रामपंचायतीत दहा वर्षांनंतर सत्तांतर झाल्याने गावकर्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपच्या अतुल भोसले गटाला विजय मिळाल्याने काका-बाबा गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, नांदगाव ग्रामपंचायतीत टि. के. पाटील, सागर कुंभार यांच्या लोकशाही पॅनेलने पाच जागा जिंकल्या आहेत. कराड दक्षिण मध्ये काले, शेरे, कार्वे या मातब्बर ग्रामपंचायतींत भाजपचा झेंडा फडकला आहे. हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.