कराडची प्रशासकीय इमारत बनली “कचराकुंड़ी”; तहसिलदार, प्रांत रावसाहेबांसह शासकीय अधिकाऱ्यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील जनतेची शासकीय कामे एकाच ठिकाणी व्हावीत या उद्देशाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निधीतून प्रशासकीय इमारत उभी राहीली आहे. सुसज्ज व देखणी इमारत कराड शहरात उभी असून केवळ तिची देखभाल न केल्याने अस्वच्छतेच्या विळख्यात ही वास्तू सापडली आहे. त्यामुळे प्रशासकीय इमारत कचराकुंडी बनल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

तालुक्यातील जनतेची शासकीय सर्व कामे एकाच ठिकाणी होण्याच्या दूरदृष्टीने माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी ही इमारत साकारली. इमारत पूर्ण झाल्यावर त्यांचा उदघाटनाचा कार्यक्रम अजूनही झालेला नाही. तरीही लोकांची कामे एकाच ठिकाणी व एकाच छताखाली व्हावीत, या उद्देशाने येथे शासकीय कार्यालये सुरू करण्यात आली. मात्र येथे काम करणारे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना केवळ आपल्या कामाशी मतलबी राहत आहेत. प्रशासकीय इमारतीत स्वच्छतेची जबाबदारी कुणाची हा संशोधनाचा विषय बनला आहे.

कराडची प्रशासकीय इमारत बनली “कचराकुंडी”; तहसिलदार, प्रांत रावसाहेबांना स्वच्छतेचे महत्व समजणार का?

प्रशाकीय इमारतीत तहसिदार, प्रांताधिकारी यांच्या महसूलसह, कृषी, सेतू कार्यालयेही आहेत. परंतु यातील कुणालाच इमारतीतील कचऱ्यांचे ढीग, गुटखा खावून केलेल्या लालभडक भिंती, फुटलेल्या काचा, नविन खुर्च्या मोडकळीस आलेल्या, फरशीवर धुळीचे थर साचलेले, भिंतीवर जाळ्या वाढलेल्या सर्वांना दिसत आहेत. मात्र वेड पाघरूंन पेडगावला जाण्य़ासारखा प्रकार येथे काम करणारे अधिकारी करत आहेत. केवळ आपली केबिन स्वच्छ ठेवून जनतेला कचराकुंडीत बसवत आहेत. शासनाने दिलेल्या इमारतीची कशी वाट लावावी, यांचे उत्तम उदाहरण हे कराडचे अधिकारी प्रशाकीय इमारतीच्या देखभालीतून दाखवून देत आहेत.

प्रशासकीय इमारतीत काम करण्यासाठी आलेल्या नविन साहित्य केवळ वापरात नसल्याने आता ते मोडकळीस आलेले असून ते भंगारात टाकण्याची वेळ आली आहे. कार्यालयाची दरवाजे कशी वापरावीत यांचेही ज्ञान येथील अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे. इमारतीत अधिकाऱ्यांच्या केबिन सोडून कार्यालयातील इतर ठिकाणीही शासकीय कागदपत्रे ढीगच्या ढीग कचराकुंडी बनून पडलेली आहेत. तसेच स्वच्छतागृहे केवळ अस्वच्छतेमुळे वापरणे मुश्किल झाले आहे. अशा या प्रशाकीय इमारतीची कंचराकुंडी करणाऱ्या रावसाहेबांना स्वच्छतेचे महत्व केव्हा कळणार आणि सुदबुध्दी कधी येणार देव जाणे.


Mr. Vishal Vaman patil

Press Reporter, Karad
contact no – 8830041073

Leave a Comment