Monday, February 6, 2023

करण- निशाच्या संसाराला हिमांशी नावाचे ग्रहण..?; सोशल मीडियावर आले चर्चांना उधाण

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहराच्या अब्रूची सध्या लत्तर उडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याची पत्नी व अभिनेत्री निशा रावल हिने त्याच्यावर घरगुती हिंसाचार आणि लग्नबाह्य अनैतिक संबंध ठेवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर तिने याबाबत त्याच्यावर पोलिसांत तक्रार केली असता मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. निशाने मीडिया कॉन्फरन्समध्ये करणचे बाहेर अफेअर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता करणचे अभिनेत्री हिमांशी पराशरसोबत संबंध असल्याची जोरदार चर्चा सर्वत्र सुरु आहे. याबाबत तसे पुरावेही सोशल मीडियावरच मिळाले आहेत. त्यांच्या कमेंट्स बॉक्सचे काही फोटोस सध्या सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.

- Advertisement -

करण आणि हिमांशी यांनी ‘मावन टंडिया चावा’ या पंजाबी मालिकेत एकमेकांसोबत काम केले होते. या मालिकेदरम्यान दोघांचे अनेक रोमँटिक फोटो देखील सोशल मीडियावर वायरल झाले होते. शिवाय त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर हिमांशीसोबत नवा संसार थाटण्यासाठी करणने निशाला मारहाण आणि मानसिक त्रास केला असल्याचे आरोप सोशल मीडियावर केले जात आहेत. शिवाय निशानेदेखील त्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप त्याच्यावर केलेच आहेत. त्यामुळे या विषयाची छाननी होणे गरजेचे आहे. दरम्यान करण आणि हिमांशीने केलेल्या इन्स्टाग्राम कमेंट बॉक्स चॅटिंगचे फोटो देखील सोशल मीडियावर वायरल होत आहेत.

https://www.instagram.com/p/CNrxSPNJi-Z/?utm_source=ig_web_copy_link

हिमांशीने अलिकडेच एक व्हिडीओ शेअर केला होता. यात ती खाली पडते व करण तिला सावरतो. यावर तिने “करण म्हणतो मी डाउन टू अर्थ आहे.” अशी कमेंट केली होती. या कमेंटवर करणने म्हटले होते कि, मी म्हणालो एवढ पण पडायला नको कि जमिनीवर येऊ.. गोड क्षण आणि शूटिंगची मजा हिमांशी पराशरसोबत.

या अशा चॅटिंगमुळेच करणच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचे काही नेटकरी म्हणत आहेत. काहींनी तर या व्हिडीओसाठी हिमांशीला ट्रोल देखील केले होते. करणला एक लहान मुलगा आहे त्याचा नाद सोड, अशी टीका तिच्यावर काही नेटकऱ्यांनी केली होती. करण-निशा प्रकरणामुळे हा व्हिडीओ आणि ते चॅट पुन्हा एकदा चांगलेच चर्चेत आले आहेत. हिमांशीने मात्र अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे शहाणपण वापरले आहे.