कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न चांगलाच पेटला असून काल कर्नाटकमधील बेळगाव येथे महाराष्ट्रातील 10 वाहनांवर दगडफेक करत हल्ला करण्यात आला. याचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटले असून जिल्हयातीळ कराड येथे आज मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला.
कराड येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यासमोर आज मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रित आले. यावेळी त्यांनी कर्नाटक सरकारचा धिक्कार असो अशा निषेधाच्या घोषणा दिल्या. कार्यकर्त्याकडून घोषणाबाजी केली जात असताना पोलिसांनी त्यांची धरपकड केली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1172616233686269
दरम्यान काल कर्नाटक येथे महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केल्यानंतर रात्री विजापूरहून साताऱ्याकडे निघालेल्या कर्नाटकच्या एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. तर आज शहरातील मुख्य चौकात मराठा महासंघाच्या कार्यकर्त्याच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले.