बंगळुरू : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका दलित मुलाने हिंदू देवाच्या मूर्तीला स्पर्श केला म्हणून त्याला 60 हजारांचा दंड (fined) ठोठावला आहे. हि संतापजनक घटना बंगळुरूपासून 60 किमी अंतरावर असलेल्या एका गावामध्ये घडली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
या गावातील एका मिरवणुकीत दलित कुटुंबातील मुलाने हिंदू देवतेच्या मूर्तीला स्पर्श केला. यानंतर या गावातील गावकऱ्यांनी त्याच्या कुटुंबाला 60 हजार रुपयांचा दंड (fined) ठोठावला. शोभम्मा ही कर्नाटकातील कोलार जिल्ह्याजवळील हुल्लेरहल्ली गावाची रहिवाशी आहे. 9 सप्टेंबर रोजी या गावात भुतायम्मा यात्रेचं आयोजन करण्यात आले होते. या यात्रेदरम्यान दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. मालूर तालुक्यातील हुल्लेरहल्ली गावात यात्रेनिमित्त मिरवणूक निघणार होती. त्याचवेळी या पीडित मुलाने तिथल्या मूर्तीला स्पर्श करून ती उचलण्याचा प्रयत्न केला.
हा सगळा प्रकार त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी पाहिला आणि त्यांना तो खटकला. ही मूर्ती उत्सवासाठी तयार करण्यात आली होती. या दलित मुलाने थेट सिद्धिराण्णाच्या मूर्तीला स्पर्श केल्याने हा वाद मोठ्या प्रमाणात वाढला. यानंतर या गावात पंचायत बसवण्यात आली. या पंचायतीमध्ये मुलाच्या कुटुंबाला साठ हजार रुपयांचा दंड (fined) ठोठावण्यात आला. जोपर्यंत दंड भरला जात नाही तोपर्यंत संबंधित मुलाला गावात येण्यास बंदी घालण्यात आली.
हे पण वाचा :
DJ च्या गाडीवर अचानक पसरला करंट; नाचता नाचता तरुणांची झाली भयंकर अवस्था
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मोठा अपघात; शिवशाही बस पलटी होऊन खड्ड्यात
Jasprit Bumrah आशिया चषक स्पर्धेला मुकणार ? समोर आलं ‘हे’ मोठं कारण
सपाच्या जिल्हा अध्यक्षांच्या गाडीला अपघात थोडक्यात बचावले, थरारक Video आला समोर
भाजप प्रदेशाध्यक्षपदी आशिष शेलारांच्या नावाची चर्चा?? तर चंद्रकांत पाटलांना…




