कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरूगेश निराणी यांना डी. लिट पदवी प्रदान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ प्रसंगी कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांना विद्यापीठाच्या वतीने डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते डी. लिट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, डॉ. सुरेश भोसले, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रविण शिंगारे, डॉ. निलम मिश्रा, विनायक भोसले आदी उपस्थित होते.

कराड येथील कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या प्रागंणात आज विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ पार पडत आहे. यावेळी उद्धघाटन कार्यक्रमप्रसंगी कर्नाटकचे उद्योगमंत्री मुरुगेश निराणी यांना हि पदवी प्रदान करण्यात आली. निराणी यांनी MRN फाऊंडेशनच्या माध्यमातून उत्तर कर्नाटकात आरोग्य शिबिरांचे आयोजन करून, आज अखेर 1 लाखांहून अधिक लोकांना मोफत उपचार मिळवून दिले आहेत. तसेच 25000 हुन अधिक लोकांना मोफत नेत्रोपचार मिळवून दिले आहेत. याशिवाय त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे.

ओमप्रकाश शेटे यानांही डी. लिट् प्रदान

ओमप्रकाश शेटे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक आहेत. 2015 ते 2019 या काळात ते मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख होते. तसेच 2017-19 या काळात ते महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या काळात त्यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून 550 कोटी रुपयांच्या निधीची मदत केली आहे. याशिवाय त्यांनी सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे.