हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। करणी सेना गतकाळात बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांविरुद्ध विविध मुद्द्यांवर विविध मते मांडून रस्त्यावर उतरली होती. पद्मावत, मणिकर्णिका या चित्रपटांचा प्रखर विरोध करताना अगदी करणी सेनेने दंड थोपटले होते. आता बॉलिवूडचा आणखी एक नवाकोरा चित्रपट करणी सेनेच्या रडारवर आला आहे. या चित्रापटाचे नाव आहे, ‘पृथ्वीराज’. होय.. बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमारच्या या आगामी चित्रपटासाठी करणी सेनेने जोरदार विरोध केला आहे. या चित्रपटाच्या ‘पृथ्वीराज’ या नावावर करणी सेनेने विरोध दर्शवत हे टायटल लवकरात लवकर बदलण्याचा इशारा दिला आहे. तर चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठीही त्यांनी मेकर्सला अटींच्या बंधनात अडकवले आहे.
https://www.instagram.com/p/B2LOONKFkRX/?utm_source=ig_web_copy_link
करणी सेनेच्या युवा संघटनेचे अध्यक्ष आणि फिल्ममेकर सुरजीत सिंग राठोड यांनी या चित्रपटाचे टायटल बदलण्याची मागणी केली आहे. पृथ्वीराज चौहान एक महान योद्धा होते. अक्षय कुमारचा हा आगामी चित्रपट पृथ्वीराज चौहान यांच्याच जीवनापटावर आधारित आहे. मग त्याचे नाव ‘पृथ्वीराज’ कसे? चित्रपटाच्या नावातही पृथ्वीराज चौहान असा पूर्ण नावाचा उल्लेख करून त्यांचा आदर करण्यात यावा, असे सुरजीत सिंह यांनी निर्मात्यांना बजावले आहे. इतकेच नाही तर हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी करणी सेनेसाठी याचे स्क्रीनिंग करण्यात यावे, अशी अटही त्यांनी ठेवली आहे. मेकर्सनी आमचा सल्ला मानला नाही तर त्यांना वाईट परिणामांना सामोरे जावे लागेल. ‘पद्मावत’वेळी संजय लीला भन्साळींसोबत काय झाले, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा सुरजीत सिंह यांनी दिला आहे.
https://www.instagram.com/p/B44Vvtql3uz/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता अक्षय कुमारने २०१९ साली त्याच्या वाढदिवसानिमित्ता या चित्रपटाची घोषणा केली होती. ‘वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्या एतिहासिक चित्रपटाची घोषणा करताना गर्व वाटतोय. हा चित्रपट माझ्या आतापर्यंतच्या मोठ्या चित्रपटांपैकी सर्वात मोठा चित्रपट आहे. पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारताना मला खूप आनंद होत आहे,’ असे त्याने म्हटले होते.
https://www.instagram.com/p/B44TJOdFzSU/?utm_source=ig_web_copy_link
‘पृथ्वीराज’मध्ये अक्षय मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री मानुषी छिल्लर स्क्रीन शेअर करणार आहे. मानुषीचा हा डेब्यू चित्रपट आहे. यात ती पृथ्वीराज चौहान यांची पत्नी राणी संयुक्ता यांची भूमिका साकारणार आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा चित्रपट आदित्य चोप्रा यांच्या निर्मितीत साकारणार आहे. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात सोनू सूद आणि संजय दत्त यांच्याही अन्य महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.