हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पिवळी ओढणी ओढलेली एक तरुणी शर्मा यांच्या गाडीच्या डिक्कीत पिस्तूल ठेवत असल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं सांगत त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
फडणवीस म्हणाले, करुणा शर्मा पिस्तूल प्रकरणी सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. बोलण्याच्या अधिकारापासून कोणालाही वंचित ठेवण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी जी काही घटना घडली आहे. त्यातून कायदा आणि सुव्यस्था कशा प्रकारे राखली जात आहे हे आपल्या समोर स्पष्ट होत आहेत, असं फडणवीस म्हणाले.
जे काही आरोप-प्रत्यारोप होत आहेत, विशेषत: पिस्तूल ठेवल्याचा व्हिडिओ आणि त्यानंतर सापडेलील पिस्तूल, या सगळ्या गोष्टी गंभीर आहेत. जे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि मिळालेलं पिस्तूल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबावाशिवाय चौकशी झाली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.