मी जर ती सीडी बाहेर काढली तर महाराष्ट्र हादरेल ; करुणा शर्मांचा धनंजय मुडेंना इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा निशाणा साधला. “माझ्या आईने जी आत्महत्या केली आहे. त्यामागे धनंजय मुंडे यांचाच हात आहे. त्यांच्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली असल्याचा गंभीर आरोप करुणा शर्मा-मुंडे यांनी केला आहे. तसेच मी जर ती सीडी बाहेर काढली तर सर्व महाराष्ट्र हादरेल, असा इशाराही त्यांनी मंत्री मुंडेंना दिला आहे.

करुणा शर्मा यांनी आज पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्या म्हणाल्या की, मुलगी शिवानीला हिला धमकावल्याने ती पत्रकार परिषदेस गैरहजर राहिली. मंत्र्यांच्या सांगण्यावरून मी बहिणीला घराबाहेर काढले,त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र, मंत्री महोदयांनीच माझ्या बहिणीच्या मोबाइलवर मेसेज केले. त्यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असा खुलासा त्यांनी यावेळी केला. तसंच धनंजय मुंडे यांच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई केली आहे.

मी मंत्री धनंजय मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहेत. मी आजपर्यंत माझे तोंड उघडले नाही, आजपर्यंत मी त्यांची इज्जत करत होते. २००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून मी बहिणींशी बोलत नाही. धनंजय मुंडे यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबध आहेत याचे पुरावे माझाकडे आहेत. छत्रपतीच्या नावाने राजकारण करणारे आज का बोलत नाहीत. सुप्रीयाताई यांच्याकडे न्यायासाठी अनेकदा विनंती केली. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मुंडेंनी मंत्री पदाचा गैरवापर केला. शरद पवारांनी मुंडेंना मंत्री पदावरून हाकलून द्यावे, अशी मागणी मुंडे यांनी केली.