कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कोळे (ता. कराड) येथील घाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेनिमीत्त झालेल्या बैलगाडी शर्यतीत आगाशिवनगर (ता. कराड) येथील अक्षय पोळ यांची काशी अणि भारत बैलजोडी अव्वल ठरली. प्रथम क्रमांकाचे 51 हजार रूपयाचे रोख बक्षिस पटकावले. तर मैदानावर प्रेक्षकांचे आकर्षण ठरलेला हिंदकेसरी बकासूर बैल दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. मात्र, प्रेक्षकांनी बकासूला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. कोळेच्या श्री. संत घाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेचे कराड- पाटण तालुक्यात मोठे महत्व आहे. यात्रेचे खास आकर्षण बैलगाड्या शर्यती आज झाल्या.
आता मोबाईलवर स्वतः चेक करा बाजारभाव
शेतकरी मित्रांनो आता खास तुमच्या फायद्यासाठी मोबाईलवर बाजारभाव स्वतः चेक करण्याची सुविधा चालू झाली आहे. शेतकरी कोणत्याही बातमीची वाट न पाहता स्वतः पाहिजे त्या शेतमालाचा राज्यातील कोणत्याही बाजारसमितीमधील रेट घरी बसून चेक करू शकतो. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच Hello Krushi नावाचे मोबाईल अँप डाउनलोड करून घ्या.
बैलगाडी शर्यतीसाठी राज्याच्या विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी हजेरी लावली. दोनशेहून अधिक बैलगाड्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. कोळेच्या सरपंच भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते उपसरपंच सुधीर कांबळे, यात्रा समिती अध्यक्ष जावेद फकीर, उपाध्यक्ष बाबुराव जाधव यासह ग्रामस्थ शर्यतप्रेमीच्या प्रमुख उपस्थीतीत स्पर्धेचे उदघाटन यावेळी झाले. सहा चाकोऱ्यातून स्पर्धा झालेल्या स्पर्धेत एकूण 42 गट पाडण्यात आले होते. अंतिम चुरशीच्या क्षणी आगाशिवनगर येथील अक्षय पोळ यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवून 51 हजार रूपयाचे रोख बक्षिस पटकावले.
स्पर्धेतील दोन ते सहा क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाची नावे व बक्षिसाची रक्कम अनुक्रमे पुढीलप्रमाणे ः- नाथसाई प्रसन्न मोहिळशेट – सुसगाव (41 हजार 111 रूपये), सदाशिव कदम- रेठरे बुद्रुक (31 हजार 111 रूपये), सोनाली एन्टरप्रायझेस- चरेगाव (21 हजार 111 रूपये), विजय पाटील- आगाशिवनगर (11 हजार 111 रूपये), खंडोबा प्रसन्न गळंगेवाडी- येडेमच्छिंद्रगड (9 हजार 999 रूपये) यांनी विजयी बाजी मारली.
विजेत्या स्पर्धकांना जनार्दन बोत्रे, अविनाश पाटील, भरत तुपे, सुभाष कराळे, श्रीरंग पाटील, आप्पासो देसाई, राजकुमार पाटील व भारत मोटर्स कराड यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. श्रीकांत कुंभार, अर्जुन कराळे, उत्तम पाटील, असलम देसाई, मेहफुज फकीर, संदीप फिरंगे, मुनीर बोजगर, महेंद्र पाटील, अधिक कराळेस अर्जून पालकर, अजिंक्यराज पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले. सोमनाथ जगदाळे यांनी झेंडापंच म्हणून काम पाहिले. बबलूभैय्या, सुनिल मोरे, रणजीत बनसोडे, विकास सर यांनी समालोचन केले.