Kawasaki Ninja 300 : ‘या’ Sport Bike वर मिळतोय बंपर डिस्काउंट; 31 डिसेंबरपर्यंत आहे ऑफर

Kawasaki Ninja 300
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2022 हे वर्ष (Kawasaki Ninja 300) संपायला अवघा 1 आठवडा राहिला असून लवकरच आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत. नवीन वर्षात नवी गाडी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यातच वर्षाच्या अखेरीस गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी अनेक दुचाकी कंपन्या वेगवेगळ्या ऑफर्स सुद्धा देत असते. तुम्ही सुद्धा नव्या वर्षात नवीन गाडी खरेदी करणार असाल तर Kawasaki Ninja 300 या स्पोर्ट बाईकवर तुम्हाला 10 हजारांचा डिस्कॉउंट मिळू शकतो.

Kawasaki Ninja 300

31 डिसेंबर पर्यंत ऑफर-

कावासाकी इंडियाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की कंपनी निन्जा 300 मोटरसायकलवर 10,000 रुपयांचा डिस्कॉउंट देत आहे. ही ऑफर 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 पर्यंतच आहे. या बाईकची किंमत 3.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते, डिस्काउंटनंतर याची किंमत 3.30 लाख रुपये होईल. (Kawasaki Ninja 300) कोणीही त्यांच्या जवळच्या कावासाकी डीलरशिपला भेट देऊन ही मोटरसायकल बुक करू शकते. निन्जा 300 ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी कावासाकी बाइक आहे. ही बाईक इतकी लोकप्रिय आहे की कंपनीने फक्त भारतीय बाजारपेठेतील BS 6 उत्सर्जन नियमांची पूर्तता करण्यासाठी बाइक अपडेट केली आहे.

Kawasaki Ninja 300

वैशिष्ट्य- Kawasaki Ninja 300

या स्पोर्ट बाईकच्या वैशिष्ट्यांबाबत बोलायचं झाल्यास यामध्ये 296cc पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड, 4-स्ट्रोक, फ्युएल -इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 11,000 RPM वर 38.4 bhp ची पॉवर आणि 10,000 RPM वर 26.1 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. (Kawasaki Ninja 300) सस्पेंशनसाठी, निन्जा 300 मध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मोनोशॉक आहेत. ही बाईक भारतात 3 रंगात उपलब्ध आहे. यामध्ये लाइम ग्रीन, कँडी लाइम ग्रीन आणि इबोनी कलर पर्यायांचा समावेश आहे.

हे पण वाचा : 

HOP OXO Electric Bike : या Electric Bike ची डिलिव्हरी सुरु; 150 किमी मायलेज

30 हजारात खरेदी करा Honda ची दमदार Bike; कुठे आहे ऑफर?

BMW Electric Scooter : BMW घेऊन येतेय Electric Scooter; दमदार लूक अन् जबरदस्त मायलेज

TVS Apache RTR 160 4V चे स्पेशल एडिशन लॉंच; पहा फीचर्स आणि किंमत