खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबलचक रांगा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. वर्षाअखेर आणि नाताळची सुट्टी त्यातच वीकेंड यामुळे अनेकजण घराबाहेर पडून सुट्टी घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचाच फटका वाहतूक कोंडीच्या रूपाने बसला आहे. सातारा बाजूकडं जाताना आज सकाळपासून चालकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागत आहे.

खंबाटकी घाटामध्ये रस्त्यावर वाहनांची संख्या जास्त झाल्याने सकाळपासूनच साताऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीनं सुरु आहे. त्यातच अनेक वाहनांचे इंजिन जास्तच गरम झाल्यामुळं गाड्या रस्त्यावरच बंद पडल्या. त्यामुळं पाठीमागे वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. खंबाटकी घाटातून बाहेर पडण्यासाठी एक ते दोन तासांचा वेळ लागत आहे.

दरम्यान, खंबाटकी घाटात सातत्याने वाहतूक कोंडी झाल्याची आपण बघितलं आहे. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा एखादा सण येतो किंवा सलग सुट्ट्यांमुळे जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर येतात तेव्हा तेव्हा खंबाटकी घाटातून प्रवास करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो ही चिंतेची बाब आहे.