नवी दिल्ली । देशभरात फास्टॅगच्या (FASTag) अंमलबजावणीनंतर सरकार अद्याप याचा वापर न करणाऱ्यांकडून दुप्पट दंड वसूल करीत आहे. येथे पेटीएम पासून ते अनेक बँकांनी देखील FASTag ची सुविधा पुरविली आहे. या सर्व गोष्टींमध्ये, अशी एक गोष्ट आहे जाची आपल्याला माहित असणे फार महत्वाचे आहे, ज्याची काळजी घेतली गेली नाही तर आपल्याला आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. यात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार बदलताना किंवा विक्री करताना जुन्या कारमधील FASTag कसे डिएक्टिवेट (Deactivate) करावे. हे का महत्वाचे आहे ते जाणून घेउयात…
आपण ही चूक तर करत नाही ना…
FASTag घेण्याच्या वेळी आपण आपले वॉलेट किंवा बँक खात्याशी लिंक करतो, ज्याद्वारे आपोआप टोल टॅक्स शुल्क कट केले जाते. अशा परिस्थितीत कारची विक्री किंवा देवाणघेवाण करताना, आपण आपले जुने FASTag काढून टाकले नाही आणि कोणी त्याचा वापर केला तर आपल्या खात्यातून पैसे कट केले जातील. मुंबईत राहणाऱ्या तुषारनेही अशीच चूक केली, त्याने आपली कार विकली आणि FASTag काढायला विसरला. आणि खरी गंम्मत अशी कि ज्याला कार विकली त्या व्यक्तीचा नंबरही त्याच्याकडून हरवला गेला, विकल्या गेलेल्या कारमध्ये जो फास्टॅग (FASTag) आहे त्याचा वापर समोरचा करत आहे आणि अंकितच्या खात्यातून ही रक्कम कट केली जात आहे. जेव्हा अंकितने त्याला डिएक्टिवेट (Deactivate) करण्यासाठी प्रोसेस सुरू केली, तेव्हा त्याला कळले की, त्याच्याकडे FASTag चा सीरियल नंबर असणे गरजेचे आहे, अन्यथा तो डिएक्टिवेट करता येणार नाही. म्हणूनच, आपल्याकडे असलेल्या सर्व कारमधील FASTag च्या सीरियल नंबर नोंद ठेवणे फार महत्वाचे आहे.
अशा प्रकारे डिएक्टिवेट करा
जर आपण एखादी कार विकत किंवा एक्सचेंज करत असाल तर आपण FASTag काढून टाकणे चांगले होईल. जर काही कारणास्तव तो कायम राहिला असेल तर यासाठी आपल्याला आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर वरून FASTag च्या 1800-120-4210 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल. येथून आपल्या मोबाईलवर लिंक येईल जिथे तुम्हाला गाड़ीचा रजिस्ट्रेशन नंबर, FASTag चा सीरियल नंबर एंटर करावा लागेल, त्यानंतरच आपण त्यास डिएक्टिवेट करू शकाल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.