हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Social Media :सध्याचे जग हे सोशल मीडियाचे आहे. आजकाल प्रत्येक गोष्ट ही सोशल मीडियावर शेअर केली जात आहे. अशातच स्मार्टफोन आणि इंटरनेट मुले तर आपण जगभरातील अनेक गोष्टीशी जोडले जातो आहे. मात्र सोशल मीडिया आणि मेसेजिंग ऍप्समुळे आपली प्रायव्हसी धोक्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे अनेक हॅकर्स देखील अनेक नवनवीन मार्गाने लोकांची फसवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत सोशल मीडियाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून नुकतेच एक ट्विट केले आहे. यामध्ये Social Media वर आपले अकाउंट सुरक्षित कसे ठेवावे हे सांगितले गेले आहेत.
1- नेहमी Logout करा
ट्विटर,फेसबुक, इंस्टाग्राम यांसारखे सोशल मीडिया अकाउंट वापरल्यानंतर नेहमी लॉगआउट करा. यामुळे आपले अकाउंट हॅक होण्याचा धोका कमी होतो. बऱ्याचदा आपण दुसऱ्याच्या लॅपटॉप, फोनवरून सोशल मीडिया अकाउंटवर लॉग इन करतो, त्यामुळे लॉगआउट करणे नेहमीच सेफ राहील.
2- Social Media चे डिटेल्स शेअर करू नका
आपले सोशल मीडिया डिटेल्स जसे की पासवर्ड यांसारखी माहिती कोणाशीही शेअर करू नका. असे केल्याने आपले अकाउंट धोक्यात येऊ शकते.
8 Ways to Stay Safe on #SocialMedia #cybersecurity #internet @IndianCERT @Cyberdost @NICMeity @AshwiniVaishnaw @Rajeev_GoI @alkesh12sharma pic.twitter.com/bS1wMZ5vAK
— Ministry of Electronics & IT (@GoI_MeitY) June 9, 2022
3- अज्ञात फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका
Social Media वर अनेक प्रकारची लोकं असतात त्यामुळे आपल्याला आलेली प्रत्येक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. काही लोकं फसवणूक करण्यासाठी फेक अकाउंट देखील तयार करतात.
4- पब्लिक सर्च मधून आपली प्रोफाइल ब्लॉक करा
फेसबुक सारख्या Social Media अकाउंटमध्ये असा पर्याय मिळतो, ज्याद्वारे आपली प्रोफाइल सिक्योर करता येईल.
5- अज्ञात लिंकवर क्लिक करू नका
सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या लोभसवाण्या ऑफरच्या अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा. हॅकर्सकडून अशा प्रकारच्या लिंक पाठवलय जातात, त्यावर क्लिक केल्यास आपले अकाउंट खाते हॅक होण्याचा धोका असेल.
6- घराचा/ऑफिसचा पत्ता शेअर करू नका
सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट किंवा फोटो बरोबर आपण लोकेशन देखील टाकतो. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर आपल्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता कधीही टाकू नका.
7- फोटो, स्टेटस शेअर करताना काळजी घ्या
Social Media वर फोटो, स्टेटस किंवा कमेंट पोस्ट करताना जास्तीत जास्त सावधगिरी बाळगा.
8- प्रायव्हसी सेटिंगची काळजी घ्या
सोशल मीडियावर आपल्या प्रायव्हसी सेटिंग्ज शक्य तितक्या मर्यादित करा. विशेषतः लोकांसाठी प्रोफाइलवर जास्त सिक्योरिटी ठेवा.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nortonlifelockpartner.com/security-center/15-social-networking-safety-tips.html
हे पण वाचा :
SUV खरेदी करायची आहे ??? त्याआधी ‘हे’ टॉप 10 मॉडेल पहा
LIC पॉलिसी कशी सरेंडर करावी ??? त्यासाठी काय करावे लागेल हे समजून घ्या
Business Ideas : मोबाईल-लॅपटॉप रिपेअर सेंटरद्वारे कमवा लाखो रुपये !!!
SIP : 500 रुपयांच्या नियमित गुंतवणुकीने लाखो रुपयांचा फंड कसा तयार करावा हे समजून घ्या
LPG गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे !!!