शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवणे धोकादायक; किती दिवस ठेवणं योग्य?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकालच्या धावपळीच्या जगात काहीजण २ वेळचे जेवण एकाच वेळी बनवतात आणि फ्रीझ मध्ये ठेऊन दुसऱ्या वेळी खातात. परंतु असं करणं आरोग्यासाठी योग्य नाही. बरेच आरोग्य तज्ञ शिजलेले अन्न जास्त वेळ फ्रीजमध्ये न ठेवण्याचा सल्ला देतात. फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवलेल्या अन्नाचे काय तोटे आहेत आणि ते किती वेळ साठवून ठेवणे योग्य आहे याबाबत आपण जाणून घेऊया..

तज्ज्ञांच्या मते, काही लोकांना वाटते की फ्रिजमध्ये अन्न ठेवल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात, परंतु हा चुकीचा समज आहे. खरं तर स्वयंपाक करतानाच अन्नातील अनेक घटक नष्ट होतात. पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्वे हे सर्वात अस्थिर आणि सहज गमावले जाणारे पोषक असतात. आपण जेव्हा जेवण बनवत असतो तेव्हाच खरं तर यातील जीवनसत्त्वे नष्ट होतात, फ्रीझ मधील थंडपणाने नव्हे असं तज्ज्ञ म्हणतात. शिजवलेले अन्न स्टीलच्या टिफिनमध्ये ठेवणे सर्वात सुरक्षित आहे. जर शिजवलेले अन्न हवाबंद डब्यात ठेवले तर ते दोन-तीन दिवस टिकू शकते.

तज्ञ म्हणतात की मांस, पोल्ट्री, मासे, दुग्धजन्य पदार्थ यांसारखे लवकर खराब होणारे पदार्थ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावेत मात्र २-३ दिवसात संपवून टाकावे. तर ब्रेड, फळे आणि भाज्या यासारखे लवकर खराब न होणारे पदार्थ जास्त काळ साठवून ठेवता येतात. फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नामध्ये ३ ते ४ दिवसांनी बॅक्टेरिया वाढू लागतात. यानंतर, जास्त दिवस ठेवलेल्या अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते.