Keeway SR125 : दिवाळीपूर्वी लॉन्च झाली ‘ही’ दमदार बाईक; पहा फीचर्स आणि किंमत

Keeway SR125
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Keeway India ने आपली (Keeway SR125) नवी रेट्रो बाईक SR 125 लाँच केली आहे. कंपनीने या गाडीची किंमत 1.19 लाख रुपये ठेवली आहे. या गाडीचे बुकिंगही सुरू करण्यात आले असून केवळ 1 हजार रुपयांमध्ये ती बुक करता येणार आहे. बाजारात या बाईकचा थेट सामना बजाज पल्सर NS125, TVS Raider 125 आणि Honda SP125 या गाड्यांशी होईल.

फीचर्स –

गाडीच्या लुक्स आणि वैशिष्ट्यांबद्दल (Keeway SR125) बोलायचं झाल्यास, यामध्ये राउंड हेडलॅम्प, राउंड ब्लिंकर्स, इंजिन किल स्विच, नवीन डिझाइन केलेली इंधन टाकी, डिजिटल राऊंड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सिंगल पीस सीट सेटअप, क्रोम फिनिश, टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेंशन, डुअल शॉक रियर अब्जॉर्बर, डुअल पर्पज टायर, ब्लैक फिनिश्ड स्पोक व्हील्स यासह अनेक फीचर्स पहायला मिळतील. ही गाडी ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी ब्लॅक आणि ग्लॉसी रेड या ३ रंगात उपलब्ध आहे.

Keeway SR125

इंजिन – (Keeway SR125)

Keeway च्या या बाईक मध्ये 125cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, फ्यूल-इंजेक्टेड इंजिन आहे जे 9,000 RPM वर 9.5 bhp पॉवर आणि 7,500 RPM वर 8.2 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल (Keeway SR125) गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. यात टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक एब्जॉर्बर आहेत. मोटरसायकलला कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टीमसह पुढील आणि मागील दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक मिळतात.

Keeway SR125

किंमत –

गाडीच्या किमतीबाबत (Keeway SR125) बोलायचं झाल्यास कंपनीने या दमदार बाईकची एक्स-शोरूम किंमत 1.19 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीकडून गाडीच्या बुकिंगला सुरुवातही झाली आहे. कंपनीच्या वेबसाइटवरून किंवा त्यांच्या जवळच्या Keeway-Benelli डीलरशिपला 1,000 रुपयांच्या टोकन रकमेसह मोटारसायकल ऑनलाइन बुक करू शकता.

हे पण वाचा :

Zontes 350R : भारतात लॉन्च झाली Zontes 350R स्ट्रीटफायटर बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत

Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स

Ducati Streetfighter V2: 955cc च्या इंजिनसह Ducati ने लाँच केली दमदार बाईक; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये