पॉर्न-स्टार Kendra Lust रिंकूच्या खेळीवर फिदा; Tweet करत म्हणाली की….

kendra lust rinku singh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तडाखेबंद फलंदाज रिंकू सिंग याने गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात अखेरच्या षटकात 5 सिक्स मारत अशक्यप्राय विजय मिळवून दिल्यांनतर सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रिंकू सिंगच्या या खेळीचे बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, त्याची मुलगी सुहाना खान आणि अनन्या पांडे यांनी कौतुक केलं होत. यामध्ये आता प्रसिद्ध पॉर्न-स्टार केंद्रा लस्ट (Kendra Lust) हिचीही भर पडली आहे.

केन्द्राने तिच्या ट्विटर अकाउंट वर रिंकूचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्याला बॅकग्राउंड केकेआरचा लोगो दिसत आहे. रिंकूच्या या फोटो शेजारी केंद्राने तिचाही फोटो अपलोड केला आहे. “रिंकू द किंग” असं कॅप्शन तिने या ट्विटला दिले आहे. केंद्राचे हे ट्विट काही वेळातच जगभरात व्हायरल झाले. तिच्या या ट्विटमुळे रिंकूच्या ऐतिहासिक खेळीवर ती फिदा झाल्याचे स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, गुजरात विरुद्धच्या सामन्यात 205 धावांचा पाठलाग करताना कोलकाताने अशक्यप्राय विजय मिळवला. अखेरच्या षटकात कोलकाताला २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने यश दयालच्या गोलंदाजीवर सलग ५ गगनचुंबी षटकार मारत आयपीएल इतिहासातील सर्वात संस्मरणीय असा विजय कोलकाताच्या मिळवून दिला. या सामन्यात रिंकूने 21 चेंडूत 48 धावांची खेळी केली. या तडाखेबंद खेळीमुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात फक्त रिंकूचीच चर्चा सुरु आहे.