केरळ हादरले : भाजप नेत्यासह दोघांची 12 तासात हत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | केरळ राज्यात 12 तासांमध्‍ये दोन राजस्‍तरीय राजकीय नेत्‍यांच्‍या हत्‍या झाल्‍याने राज्य हादरले आहे. केरळमधील अलप्‍पुझा जिल्‍ह्यात सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (‘एसडीपीआय’ ) अध्‍यक्ष शान केएस यांची शनिवारी रात्री हत्या करण्यात आली. त्यानंतर अवघ्‍या काही तासांमध्‍ये भारतीय जनता पक्षाचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची रविवारी आज सकाळी मार्निंग वॉकला गेल्यानंतर हत्‍या करण्‍यात आली. या दोन नेत्याच्या हत्येनंतर केरळचे मुख्‍यमंत्री पिनाराई यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.

भाजपचे नेते रंजीत श्रीनिवास आज सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. ते घरी परतत असताना आठ जणांनी त्‍यांच्‍यावर हल्‍ला केला. यातील काहींनी त्‍यांना चाकूने भोसकले. हॉस्‍पिटलमध्‍ये घेवून जात असताना त्‍यांचा मृत्‍यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्‍थळी श्रीनिवासन समर्थकांची गर्दी झाल्‍याने प्रचंड तणाव निर्माण झाला हाेता. रंजीत श्रीनिवास हे भाजप ओबीसी मोर्चाचे राज्‍य सचिव होते.

तर काल रात्री ‘एसडीपीआय’ राज्‍य सचिवांना भोसकले सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (‘एसडीपीआय’ ) राज्‍य सचिव शान केएस (वय- 38) यांची शनिवारी रात्री चाकूने भोसकून हत्‍या करण्‍यात आली. शान केएस हे शनिवारी सायंकाळी स्‍कुटरवरुन घरी परतत होते. कारमधून आलेल्‍या हल्‍लेखोरांनी प्रथम त्‍यांना धडक दिली. शान हे खाली पडले. यानंतर हल्‍लेखोरांनी चाकूने भोसकून त्‍यांची हत्‍या केली.

 

Leave a Comment