सलमानपाठोपाठ आता ‘हा’ सुपस्टारही राबतोय शेतात; व्हिडिओ झाला व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | करोना विषाणूमुळे चित्रपट व मालिकांचं थांबलेलं चित्रीकरण आता पुन्हा एकदा सुरु होतं आहे. मात्र अजुनही अनेक कलाकार करोनाच्या भीतीमुळे काम करण्यासाठी मुंबईत परतलेले नाहीत. भोजपूरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता खेसारी लाल यादव याने देखील अद्याप शूटिंगपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी तो शेतात काम करुन आपला वेळ घालवत आहे.

खेसारी लाल सलमान खानचा खूप मोठा फॅन आहे. अनेकदा त्याने अभिनय करताना सलमानला फॉलो करत असल्याचं सांगितलं आहे. ऑनस्क्रीनसोबतच आता तो ऑफस्क्रीन देखील तो सलमानला फॉलो करताना दिसत आहे. सलमान पनवेलमध्ये शेती करतोय व खेसारी बिहारमध्ये आपल्या गावी शेती करत आहे. खेसारी लालचा लावणी करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो शेती कशी करायची? याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती देत आहे. त्याच्यासोबत त्याचे गावातील मित्र देखील काम करताना दिसत आहेत.

खेसारी लाल यादव भोजपुरी सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता आहे. खेसारी प्रामुख्याने अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. ‘हम है हिंदूस्तानी’, ‘दबंग सरकार’, ‘भाग खेसारी भाग’, ‘खिलाडी’, ‘कुली नंबर वन’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

हे पण वाचा –

लाॅकडाउनमध्ये वाढली Sex Toys ची मागणी! कंडोमची ऑनलाईन विक्री तेजीत

धक्कादायक! विवाहितेवर बलात्कार करून केले व्हिडीओ शुटिंग

लाॅकडाउनमध्ये पत्नीचा १० हजारात केला २ तासांसाठी सौदा! पुढे झालं असं काही

लज्जास्पद! नांदेडमध्ये शिक्षकांनीच केला सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार

उझबेकिस्तानमध्ये बसून ‘ती’ मुंबईत चालवायची SEX रेकेट; ८० हजार रेट!