संस्कृती जपणारा मानाचा पाचवा ‘केसरीवाडा गणपती’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

#गणेशोउत्सव | पुण्यात मानाचे पाच गणपती आहेत. या पाच गणपतीमध्ये पाचवे स्थान असणारा केसरीवाडा गणपती त्याच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे महत्त्वाचा ठरतो. गणेशोत्सव काळात दिवसभर महिला- मुलांसाठी स्पर्धा घेतल्या जातात. ज्यात नागरिकांचा मोठा सहभाग असतो.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पारंपरिक लाकडी पालखीत विराजमान होऊन वाजत गाजत बाप्पांचे आगमन झाले. बिडवे बंधूंच्या सनई वादनासहित श्रीराम आणि शिवमुद्रा या पथकांनी वादन केले. ‘केसरी’चे विश्‍वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते या गणपतीची प्रतिष्ठापना झाली. सकाळी सुरु झालेली ही मिरवणूक नारायण पेठेतील मणिकेश्वर विष्णू चौक- उंबऱ्या गणपती चौक- शेडगे विठोबा चौक- माती गणपती मंदिर- केसरीवाडा अशी पार पडली. १८९४ साली लोकमान्य टिळकांच्या हस्ते प्रथम स्थापना झालेल्या या गणपतीचे हे १२६ वे वर्ष आहे.

हा संपूर्ण गणेशोत्सव केसरी-मराठा ट्रस्टच्या माध्यमातून पार पडला जात असून त्यासाठी वर्गणी जमा केली जात नाही. समाज प्रबोधनाला या उत्सवात नेहमीच प्राधान्य दिले जाते. ध्वनीवर्धकाचे निर्बंध नव्हते तोपर्यंत या उत्सवाचे २ भाग असत – संध्याकाळच्या वेळी ज्ञानसत्र होत असे आणि त्यानंतर रात्री करमणुकीचे कार्यक्रम असत. परंतु निर्बंधांमुळे यात काही मर्यादा आल्या असून कार्यक्रम वेळेत पार पाडणे गरजेचे असल्याने यात बदल करण्यात आला आहे

Leave a Comment