राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर खुशबू सुंदर यांचं ‘ते’ जुनं Tweet व्हायरल

rahul gandhi khushbu sundar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असं वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा ठोठावली तसेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांची खासदारकी सुद्धा रद्द केली आहे. यामुळे देशभरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्यात आल्यांनतर सध्या भाजपचं प्रतिनिधित्त्व करत असलेल्या परंतु एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या नेत्या खुशबू सुंदर यांचे एक जून ट्विट व्हायरल होत आहे.

2018 मध्ये, जेव्हा खुशबू सुंदर कॉंग्रेसमध्ये होत्या तेव्हा त्यांनीही ट्विट करत मोदींना भ्रष्टाचारी म्हंटल होत. इकडेही मोदी, तिकडेही मोदी.. बघावं तिकडे मोदीच.. प्रत्येक मोदी आडनावासमोर भ्रष्टाचार लिहिलेला आहे. मोदी म्हणजे भ्रष्टाचार.. चला मोदी या नावाचा अर्थ भ्रष्टाचार असा करूया .. ललीत, निरव आणि नमो = भ्रष्टाचार असं ट्विट खुशबू सुंदर यांनी केलं होत.

खुशबू सुंदर यांच्या हे जुनं ट्विट आता काँग्रेसच्या काही ट्विटर हॅन्डल वरून व्हायरल करण्यात आले आहे. आणि ज्या पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात याचिका दाखल केली होती त्यांना थेट सवाल करण्यात आला आहे की आता तुम्ही भाजपच्याच नेत्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य असलेल्या खुशबू सुंदर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणार का?

दरम्यान, खुशबू सुंदर यांनी त्यांच्या या जुन्या ट्विटवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही आणि ते ट्विट हटवलंही नाही. मात्र राहुल गांधींवर मात्र त्यांनी या कारवाईननंतर निशाणा साधला आहे. मनमोहन सिंग जी 2013 मध्ये झालेल्या SC निकालावर अध्यादेश आणू इच्छित होते.परंतु राहुल गांधी यांनी त्याचे तुकडे तुकडे केले. गंमत म्हणजे, त्यांची अपात्रता त्याच निकालातून आली आहे. #कर्मा असं ट्विट करत खुशबू यांनी राहुल गांधींना डिवचलं आहे.