आयपीएलपूर्वीच वडिलांचे निधन ; मैदानातच हात जोडून पोलार्डने केलं वंदन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात मुंबईचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याने तुफानी खेळी करत अशक्य वाटणारा विजय शक्य करून दाखवला. पोलार्डच्या वादळी खेळीमुळे चेन्नई अक्षरशः भुईसपाट झाली. पोलार्डच्या खेळीने मुंबईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा 200 पेक्षा अधिक विजयी धावांचे यशस्वीपणे पाठलाग केला आहे.

219 धावांच्या तगड्या आव्हानांचा पाठलाग करताना पोलार्ड ने 34 चेंडूत नाबाद 87 धावा ठोकल्या. पोलार्डने 6 फोर आणि 8 सिक्स ठोकले. दरम्यान अर्धशतकानंतर पोलार्डने बॅट, हेल्मेट काढून जमिनीवर ठेवले आणि हात जोडून आकाशाकडे पाहून डोळे घट्ट मिटून उभा राहिला.
पोलार्डने आपलं हे अर्धशतक आपल्या पित्याला अर्पण केलं.

https://www.instagram.com/p/CMyBjLupT8i/?igshid=kbc2vyafih4v

आयपीएलच्या काही आठवड्यांपूर्वीच पोलार्डच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी पोलार्डने 24 मार्च रोजी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. “शांतपणे आणि सन्मानाने स्थिरावा. नेहमीच प्रेम राहील. अनेकांची मनं जिंकली. तुम्हाला नेहमीच माझा अभिमान वाटेल. आता उंच मुलगा नाही. मला माहित आहे की आपण एका चांगल्या ठिकाणी आहात” असं पोलार्ड म्हणाला होता. पोलार्डने आयपीएल ट्रॉफी घेतलेला वडिलांसोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.