धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाडीने घाव करून पत्नीसमोरच केली मित्राची हत्या

0
46
Murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पालघर : हॅलो महाराष्ट्र – सफाळे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन मित्रांमध्ये झालेल्या भांडणात अंकुश लहू वरठा ह्या 19 वर्षीय आरोपीने आपला मित्र धिरज राम प्रसाद गौड याला त्याच्या पत्नीसमोरच डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्याची हत्या केली आहे. फरार झालेल्या आरोपीला उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक आणि त्यांच्या टीमने डहाणू येथून अटक करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण
सफाळे येथील सरू पाडा येथे राहणारे दोन मित्र बिगारी काम करीत होते. दारू प्यायल्यानंतर ह्या दोन्ही मित्रांमध्ये नेहमी भांडणे होत होती. शनिवारी संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास सफाळेमध्ये एका दुकानासमोर त्या दोघांचे पुन्हा एकदा भांडण झाले. ह्यावेळी आरोपी आपल्या हातात कोयता घेऊन आल्या नंतर उपस्थित काही लोकांनी त्यांचे भांडण मिटविले. यानंतर मृत व्यक्ती घरी निघून गेला. काही वेळानंतर हातात कुऱ्हाड घेऊन आरोपी मृत धिरज ह्याच्या घरी आला.आणि झोपलेल्या धिरज च्या डोक्यात त्याच्या पत्नीच्या समोरच त्याने कुऱ्हाडीने घाव घातला.

यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेची माहिती मिळताच सफाळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप कहाळे ह्यांना ह्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पळून गेल्याचे पाहिल्यावर पोलिसांनी सफाळे येथील जंगलात त्याचा शोध घेतला पण तो काही सापडला नाही. यानंतर रविवारी सकाळी लोकल पकडून डहाणू येथील एका आदिवासी पाड्यात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली. मृत धिरज ह्याला उपचारासाठी नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here