किम जोंगने लहान मुलांनाही सोडलं नाही; ‘तो’ व्हिडिओ पाहिल्याने सुनावली 12 वर्षाची सक्त मजुरी

kim jong un
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांच्या तानाशाहीबद्दल तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. हुकूमशाह किम जोंगने उत्तर कोरियात बनवलेलं वेगवेगळे नियम आणि शिक्षा यामुळे तेथील नागरिक चांगलेच त्रस्त आहेत. पण किम विरोधात ब्र शब्द काढायची पण कोणाची हिम्मत नाही. किम जोंगने असे काही नियम बनवले आहेत की ज्याचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेला सामोरे जावं लागत, किम कोणावरही दया दाखवत नाही. असाच एक प्रकार समोर आला आहे. दक्षिण कोरियन विडिओ पाहिल्याबद्दल किमने २ लहान मुलाना तब्बल १२ वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील हाडवैर संपूर्ण जगाला माहीत आहे. त्यामुळेच ही शिक्षा सुनावण्यात आली. याबाबत उत्तर कोरियामधील कठोर शासनाचा व्हिडीओ झाला आहे.उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांग येथील १६ वर्षाच्या २ तरुणांना दक्षिण कोरियन व्हिडीओ (K-Pop K-Drama) पाहणं चांगलंच अंगलटि आलं आहे. K-Pop K-Drama हे पॉप मनोरंजन चित्रपट आहेत ज्यामध्ये दक्षिण कोरियाच्या संस्कृतीचा प्रभाव पडतो. त्यामुळेच किम जोंग अशा विडिओचा तिरस्कार करतो.

यापूर्वी सुद्धा त्याने 2020 मध्ये, दक्षिण कोरियाच्या मनोरंजनाचा आनंद घेताना किंवा बाहेरील प्रभावांविरुद्धच्या युद्धात दक्षिण कोरियाचे लोक ज्या पद्धतीने बोलतात त्याची नक्कल करताना पकडल्या गेलेल्यांसाठी कठोर शिक्षा लागू केली होती. उत्तर कोरियामध्ये इतर देशांच्या तुलनेत अनेक चित्रविचित्र कायदे आहेत त्यामुळे तिथल्या नियमात राहणे हे काय साधे सोप्प काम नाही . उत्तर कोरियात राहून दक्षिण कोरियाचे कौतुक केल्यास तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावं लागू शकते. तसेच उत्तर कोरियाने देशातील फोटो, व्हिडिओ आणि इतर जीवनाचे पुरावे बाहेरील जगाकडे लीक करण्यास मनाई आहे. असे करणाऱ्याला कठोर शिक्षा केली जाते.