हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना कायदा मंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अर्जुन राम मेघवाल यांना कायदा मंत्री करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या अधिसूचनेत मेघवाल यांना स्वतंत्र पदभार देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. रिजीजू यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
2021 मध्ये रिजिजू यांना कायदा मंत्री करण्यात आले. आता त्यांच्याकडे हे पद काढून त्यांना भू विज्ञान मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. रिजिजू यांच्या कायदामंत्री असताना, न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून त्यांच्या न्यायव्यवस्थेशी वाद झाल्याच्या अनेक समोर आल्या होत्या. त्यांची विधाने आणि निर्णय वादग्रस्त ठरले होते.
Arjun Ram Meghwal replaces Kiren Rijiju as the Law Minister. Rijijiu assigned the Ministry of Earth Sciences pic.twitter.com/0chlEZG9un
— ANI (@ANI) May 18, 2023
कोण आहेत अर्जुन राम मेघवाल
अर्जुन राम मेघवाल हे राजस्थानमधून येतात. ते भाजपच्या मोठ्या दलित चेहऱ्यांपैकी एक असून आपल्या साधेपणासाठी देशभर प्रचलित आहेत. सायकल वरून सुद्धा ते अनेकदा संसदेत जाताना दिसले आहेत . येत्या काही दिवसात राजस्थान मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्जुन राम मेघवाल याना कायदामंत्री करणं भाजपच्या पथ्यावर पडू शकत.