Sunday, May 28, 2023

अनिल परब यांचा 7/12 कोरा करणार, त्यांना जेलमध्ये सर्व हिशोब द्यावे लागणार; किरीट सोमय्यांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संपत्तीवर काल ईडीच्यावतीने धाडसत्र राबवण्यात आले. तसेच दिवसभरात तब्बल 13 तास त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान यावरून आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. अनिल परब हे महाराष्ट्रातील सर्वात खोटारडे मंत्री आहेत. त्यांनीच साई रिसॉर्टचे कर भरले आहेत. त्यांना नक्कीच आपण जेलची हवा खायला लावणार असून त्या ठिकाणी त्यांना सर्व हिशोब द्यावा लागणार आहे. त्याचा 7/12 ही मी कोरा करणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आता सर्व पुरावे ईडीला मिळाले असूनही अनिल परब म्हणतात तो मी नव्हेच. माझा परब यांना सवाल आहे की, रिसॉर्टचा टॅक्स अनिल परब तुम्ही भरता मग रिसॉर्ट कदमांचा कसा? वास्तविक ईडीच्या कारवाईनंतर आता कदम आणि परबांचे पोपट आता बोलायला लागले आहेत. आता सरळपणे अनि परबांनी आपली नौटंकी बंद करावी.

यशवंत जाधवांबाबत सांगायचे झाले तर जाधवांनी 1 रुपयांचा शेअर्स तब्बल 500 रुपयांना विकला आहे. त्यामुळे आता यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आता जाधव यांच्यानंतर श्रीधर पाटणकर यांचा नंबर आहे. न्यायालयही म्हंटणार आहे कि पाटणकर हाजीर हो…, असे सोमय्या यांनी सांगितले.