हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील एकामागून एक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारे भाजप खासदार किरीट सोमय्या सोमवारी पुन्हा एकदा मोठा बॉम्ब टाकत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या एका मंत्र्यांचा घोटाळा बाहेर काढणार आहेत. त्यांनी या दोन्ही नेत्यांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहेत. त्यामुळे हे दोन नेते कोण? यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत
किरीट सोमय्या म्हणाले, माझ्याकडे दोन गठ्ठे आहेत. पहिल्या गठ्ठ्यात 24 हजार पाने आहेत. त्यात ठाकरे सरकारच्या एका नेत्याचा घोटाळा आहे. दुसरा जो गठ्ठा आहे त्यात चार हजार पानं आहेत. तो शरद पवार यांच्या एका मंत्र्याच्या घोटाळ्याचा आहे.
यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधला. छगन भुजबळ यांना एवढेच सांगायचे की उड्या मारू नका असा इशारा देत ज्या कारणामुळे सुप्रीम कोर्टाने तुरुंगात डांबलं ती केस प्रकरण अजूनही सुरूच आहे असे सोमय्यांनी सांगितले.