आता खोटं रडणाऱ्यांची ताईगिरी कुठे गेली? महापौर पेडणेकरांचा संतप्त सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नगरसेविका अंजली खेडेकर यांच्या कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. कारण साकीनाका बलात्कार प्रकरणानंतर कायदा सुव्यवस्थेवरुन भाजपच्या 12 महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सडेतोड प्रश्न विचारले होते.अशात भाजपच्याच कार्यालयात एका कार्यकर्त्याने महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर महापौर किशोरी पेडणेकर चांगल्याच आक्रमक झाल्या असून त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं, इतर घडलेल्या घटनांवर भाजपच्या महिला राजकारण करतात. स्वत:च्या दिव्याखाली अंधार. जेव्हा तुमच्याच ऑफिसमध्ये अशा घटना घडतात तेव्हा तुमची ताईगिरी जाते कुठे? असा सवाल त्यांनी केला.

भाजपच्या महिला आता गप्प का? भाजप नेहमीच महाराष्ट्राला बदमान करण्याचा प्रयत्नात असते. खोटं रडून दाखवता. भाजपशासित राज्यात महिलां अत्याचाराच्या घटना खूप घडत आहेत. आता ताईंगिरी कुठे गेली? फोन बंद का? असा हल्लाबोल महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर केला.

You might also like