EPFO Rules | सरकारी क्षेत्रात जे लोक काम करतात. त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर पेन्शन दिले जाते. त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी मिळते. म्हणजेच कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक अडचणींना सामोरे जाऊ नये. म्हणून हा निधी जमा करण्यासाठी कंपनी ही दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून पीएफ समान रक्कम जमा करत असते. सरकारकडून व्याज देखील मिळते सध्या या पीएफवर कर्मचाऱ्यांना 8.15 टक्के एवढे व्याज मिळत आहे.
हा पीएफ आपल्या निवृत्तीसाठी जमा करण्यात आलेला असतो. परंतु तुम्हाला जर गरज पडली तर ते पैसे तुम्हाला काढण्याची मुभा देखील सरकार करून दिलेली आहे. परंतु जी गरज आहे त्या गरजेनुसार पीएफ काढण्यासाठी सरकारने काही नियम देखील लावून दिलेले आहेत. तुम्हाला जर आता पीएफमधून (EPFO Rules) पैसे काढायचे असेल आणि ते कोणत्या परिस्थितीत पैसे काढायचे आहेत हे समजून घेऊया.
पीएफमधून कधी आणि किती पैसे काढता येतील?
कर्मचारी हे एकाच वेळी पीएफ खंडातनं पूर्ण किंवा आंशिक पैसे काढू शकता. त्यासाठी काही नियम देखील लावण्यात आलेले आहे.
पीएफमधून पूर्ण पैसे काढण्याचे नियम | EPFO Rules
कर्मचाऱ्यांची रिटायरमेंट झाल्यानंतर ही संपूर्ण पैसे काढता येतात. तसेच जर कर्मचारी 1 महिना किंवा त्याहून अधिक बेरोजगार असेल, तर पीएफच्या ७० टक्के रक्कम त्या व्यक्तीला काढता येते. तर बेरोजगारीच्या पुढील दोन महिन्यात 25 टक्के रक्कम काढता येते.
आंशिक पीएफ निधी काढण्याचा नियम
कर्मचारी हे त्यांच्या अत्यंत इमर्जन्सी पूर्ण करण्यासाठी या आंशिक निधीचा वापर करू शकतात. वेगवेगळ्या कारणांसाठी ही रक्कम काढता येते. याबाबत देखील सरकारने काही नियम लावून दिलेले आहे.
उपचारासाठी
जर वैद्यकीय उपचारासाठी पीएफ निधी काढायचा असेल, तर मूळ पगाराच्या 6 पट किंवा एकूण जमा रकमेच्या आणि पीएफ मधील कर्मचाऱ्यांच्या व्याजाची रक्कम यापैकी जे कमी असेल ते तुम्ही काढू शकत. ही रक्कम स्वतः मुले आणि तुमचे जोडीदार आणि पालक यांच्यासाठी काढू शकता.
लग्नासाठी
जर तुम्ही लग्नासाठी पीएफमधून पैसे काढत असाल तर तुमच्या कामाची 6 वर्ष सेवा पूर्ण होणे गरजेचे आहे. हा पीएफ कर्मचारी स्वतःच्या त्याचप्रमाणे मुलांच्या, मुलीच्या भावा किंवा बहिणीच्या लग्नासाठी कैसे काढू शकतात. लग्नासाठी कर्मचारी हा एकूण ठेवीच्या फक्त 50% रक्कम काढू शकतो.
शिक्षणासाठी
मुलांच्या शिक्षणासाठी पीएफ मधील 50% रक्कम काढू शकतो. यासाठी तुमचे 7 वर्षे सेवा होणे गरजेचे आहे.
जमीन किंवा घर खरेदी करण्यासाठी
जर तुम्ही घर खरेदी करण्यासाठी पीएफ काढत असाल तर तुमचा सेवेची 5 वर्षे पूर्ण होणे गरजेचे असते. जमीन खरेदी करण्यासाठी कर्मचारी हा पीएफमधून मूळ आणि महागाई भत्त्याच्या 24 पट रक्कम काढू शकतो त्याचप्रमाणे आहे
त्याचप्रमाणे घर आणि जमिनी कर्मचाऱ्यांच्या किंवा त्याच्या पत्नीच्या नावावर असणे गरजेचे आहे. जमीन आणि घर खरेदी करण्यासाठी संपूर्ण सेवेदरम्यान केवळ एकदाच पैसे काढता येतात. पैसे काढल्यानंतर घराचे काम हे 6 ते 12 महिन्यात पूर्ण झाले असले पाहिजे.
गृह कर्जाची परतफेड
होम लोन भरण्यासाठी देखील पीएफमधून पैसे काढता येतात. यासाठी 10 वर्ष तुमच्या सेवेचा कालावधी झाला असणे गरजेचे आहे. त्याशिवाय कर्मचारी हे मूळ आणि महागाई भत्ता 36 पैसे काढू शकतात..
निवृत्ती पूर्वी आंशिक पैसे काढणे
जर कर्मचाऱ्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केले असतील तर तो निवृत्तीच्या 1 वर्षाआधी पीएफमध्ये जमा झालेल्या एकूण रकमेपैकी 90 टक्के रक्कम काढू शकतो.