हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Fundamental Analysis : शेअर मार्केटद्वारे चांगला नफा मिळवायचा असेल तर त्यासाठी योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक करणे महत्वाचे ठरेल. तसेच दीर्घकालावधीसाठी कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याआधी त्या कंपनीचे फंडामेंटल एनालिसिस करता यायला हवे. हे जाणून घ्या कि,फंडामेंटल एनालिसिसद्वारे कंपनीच्या शेअर्सविषयीची योग्य माहिती कळते. त्यामुळे गुंतवणूकदारांना याविषयी माहिती असणे आवश्यक आहे.
Fundamental Analysis म्हणजे काय ???
कोणत्याही शेअर्सची रिअल व्हॅल्यू किंवा आंतरिक मूल्य जाणून घेण्यासाठी फंडामेंटल एनालिसिस म्हणजेच मूलभूत विश्लेषण केले जाते. याद्वारे, गुंतवणूकदारांना कोणतेही शेअर्स ओव्हरव्हॅल्युएड आहे की कमी आहे हे जाणून घेता येते. कोणत्याही शेअर्समध्ये दीर्घ कालावधीसाठी पैसे गुंतवून ठेवण्यासाठी एनालिसिस केले जाते.
फंडामेंटल एनालिसिस कसे करावे ???
गुंतवणूकदारांना कंपनीच्या वेबसाइटवर Fundamental Analysis साठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची माहिती मिळते. म्हणूनच कंपनीचे फंडामेंटल एनालिसिस करणे खूप सोपे असते. याद्वारे गुंतवणूकदाराला स्वतःला असे विश्लेषण करता येते. कोणत्याही शेअर्सचे Fundamental Analysis करण्यासाठी अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. यामध्ये सर्वात आधी शेअर्सच्या अर्निंग रिपोर्टकडे पहिले जाते. तसेच ती कंपनी सध्या फायद्यात आहे का ??? तिचा कॅश फ्लो कसा आहे??? कंपनीवर किती कर्जे आहेत ??? याची माहितीही कळते. या सर्व गोष्टींनंतर संबंधित कंपनीविषयीची संपूर्ण माहिती कळते.
याशिवाय, येत्या काळात कंपनी कोणाचे अधिग्रहण करणार आहे हे देखील जाणून घेणे खूप महत्वाचे ठरेल. त्याचबरोबर कंपनी कोणत्या क्षेत्रातील आहे आणि त्या क्षेत्राबाबत बाजाराची स्थिती काय असेल याकडेही लक्ष द्यावे लागेल. तसेच त्या कंपनीचे नेतृत्व कोणाकडे आहे ही आणखी एक गोष्ट मूलभूत विश्लेषणासाठी खूप महत्त्वाची ठरते.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.nseindia.com/
हे पण वाचा :
बंद झालेली LIC पॉलिसी पुन्हा सुरू करण्या संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
Bank Account : आपले बंद झालेले खाते पुन्हा सुरु करण्यासाठीचे नियम तपासा
SBI कडून ग्राहकांना धक्का !!! बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
मोबाईल कंपन्या Charger मध्ये जाणूनबुजून छोटी वायर का देतात??? जाणून घ्या यामागील कारण
FD Rates : ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ