हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Ration Card : भारतीय नागरिकांसाठी रेशन कार्ड हे अनेक महत्वाच्या डॉक्युमेंट्सपैकी एक आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) केंद्रांमधून फ्री किंवा अनुदानित धान्य मिळवण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून ते महत्त्वाचे ठरते. मात्र, आता रेशन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
हे जाणून घ्या कि, Ration Card हे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने लिंक करता येते. तसेच आता केंद्र सरकारकडून ते लिंक करण्याची शेवटची तारीख देखील 31 मार्च 2023 ते 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याद्वारे बनावट रेशन कार्डला आळा बसेल, अशी अशा केंद्र सरकारला आहे. जर आपण अजूनही ते लिंक केले नसतील तर त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या.
अशा प्रकारे करा ऑनलाइन लिंक
सर्वात आधी आपल्या राज्याच्या पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम (PDS) वेबसाइट उघडा (प्रत्येक राज्याचे स्वतःचे PDS पोर्टल आहे).
यानंतर आपले आधार सध्याच्या कार्डशी लिंक करण्याचा पर्याय निवडा.
आता क्रमाक्रमाने Ration Card, आधार कार्ड आणि रजिस्टर्ड मोबाईल फोन नंबर टाका.
‘कंटिन्यू/सबमिट’ हा पर्याय निवडा.
यानंतर मोबाईलवर आलेला OTP एंटर करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर SMS पाठवला जाईल.
अशा प्रकारे करा ऑफलाइन लिंक
यासाठी आपली कागदपत्रांची ओरिजनल आणि डुप्लिकेट कॉपी दोन्ही जवळच्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) केंद्रावर द्यावी लागेल.
ही महत्त्वाची कागदपत्रे PDS किंवा रेशन दुकानात उपलब्ध करून द्या.
PDS किंवा रेशन दुकानाचे कर्मचारी आधार कार्डची व्हॅलिडिटी व्हेरिफिकेशनसाठी फिंगरप्रिंट ऑथेंटिफिकेशन वापरतील.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर SMS अलर्ट मिळेल.
आधार आणि Ration Card लिंक झाल्यावर आणखी एक SMS मिळेल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://nfsa.gov.in/state/mh
हे पण वाचा :
Jio च्या ‘या’ प्लॅन अंतर्गत Netflix सबस्क्रिप्शन सहीत मिळवा अनेक फायदे
आता Visa शिवाय ‘या’ देशांत मिळणार प्रवेश, सर्वात स्वस्त देश कोणता ते पहा
एका Credit Card चे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डने भरा, फॉलो करा ‘या’ 3 स्टेप्स
New Business Idea : वर्षभर मागणी असणारा ‘हा’ व्यवसाय सुरु करून मिळवा हजारो रुपयांचे उत्पन्न
Bank Loan वसुलीचे नियम काय आहेत ??? बँकेच्या एजंटने कर्जाच्या वसुलीसाठी धमकावल्यास त्वरित करा ‘हे’ काम