तुम्हीही Mobile जवळ घेऊन झोपता? ‘हे’ दुष्परिणाम माहित आहेत का?

sleep with mobile
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल मोबाईल (Mobile) शिवाय जीवन जगणे कठीण होऊन जाते. कारण प्रत्येक गोष्टीत मोबाईलचा वापर वाढला आहे. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वानाच मोबाईलचे वेड लागलं आहे. येव्हडच नव्हे तर काहीजण झोपेपर्यंत आपला मोबाईल जवळ बाळगतात . परंतु मोबाईल जवळ ठेऊन झोपल्यामुळे त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात याबाबत आपल्याला कल्पना आहे का? चला तर याबाबत जाणून घेऊयात.

तुम्ही मोबाईल जवळ ठेऊन झोपत असाल तर मोबाईल मुळे तयार होणारे रेडिशन आणि मोबाईल कनेक्टिव्हिटीशी संबंधित Frequency मुळे तुम्ही अनेक गंभीर आजाराला बळी पडू शकतात . त्यामध्ये तुम्हाला हृदय विकाराचा झटका येण्याची शक्यता वाढू शकते. तुमच्या स्मरणशक्तीवर वाईट परिणाम होऊ शकतो . तुमची नवीन शिकण्याची क्षमता कमी होऊ शकते. तुम्ही anxiety आणि depression सारख्या मानसिक आजाराला बळी पडू शकता . जे लोकं मोबाईल सोबत ठेवून झोपतात त्यांना डोकेदुखी, प्रजनन क्षमता याचा त्रास होतो तसेच मोबाईलच्या प्रकाशामुळे हार्मोन्सवरही परिणाम होण्याची शक्यता असते.

झोपताना मोबाईल किती दूर ठेवावा?

आपल्यातील अनेक लोक झोपताना मोबाईल उशी खाली ठेऊन झोपतात किंवा उशीच्या बाजूला ठेवतात . परंतु हे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे. एका अहवालनुसार 68% लोक आपला मोबाईल जवळ ठेऊन झोपतात. तुमच्याकडून शक्य असेल तर झोपीच्या किमान एक तास आधी आपला मोबाईल दूर ठेवा .किंवा किमान तुमचा मोबाईल 4 फूट लांब राहील असा ठेवा . त्यामुळे मोबाईल मुळे होणाऱ्या दुष्परिणामापासून तुम्ही वाचू शकतात .