कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापुरमध्ये भर दिवसा एका वृद्ध माणसाला लुटण्यात आले आहे. या व्यक्तीचा मोबाईल आणि बॅग चोरटयांनी लंपास केली. हि चोरीची संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात ही घटना घडली आहे. सर्वात आधी या चोरटयांनी वृद्ध माणसाच्या गाडीसमोर खोट्या नोटा फेकल्या. त्यानंतर काहींनी गाडीच्या आजूबाजूला टेहाळणी केली. यानंतर त्यांनी आजोबांना खोट्या नोटा पडल्याचं सांगून गाडीचा दरवाजा उघण्यास प्रवृत्त केले. यानंतर त्यांच्यातील एकाने हळूच साईड सीटचा दरवाजा उघडला आणि सीटवरची बॅग आणि मोबाईल फोन लंपास केला. यानंतर हे सगळेजण पसार झाले. वृद्ध व्यक्तीला बोलण्याच्या नादात गुंतवून चोरांनी चलाखीनं बॅग आणि मोबाईल लंपास केला.
खोट्या नोटा गाडीसमोर चोरटयांनी वृद्ध व्यक्तीला लुटले pic.twitter.com/3NjOLQbHh9
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) April 19, 2022
काय आहे नेमके प्रकरण ?
कोल्हापुरातील शाहूपुरीत एक मारुची सुझुकीची सिलारीओ कार उभी होती. एक वृद्ध व्यक्ती या कारच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलेली दिसत आहे. सुरुवातीला काही लोक या गाडीच्या आजूबाजूला टेहाळणी करतात. त्यानंतर एक जण आपल्या खिशातील काही नोटा खाली रस्त्यावर पाडतो. या सगळ्यांपैकी एक इसम काचेतून बोलण्याचा प्रयत्न करतो. तुमचे पैसे पडल्याचे वृद्ध व्यक्तीला सांगतो. यानंतर वृद्ध व्यक्तीही पैसे पडले असावेत, या शंकेनं गाडीचा दरवाडा उघडतो आणि या ठिकाणीच ते चोरट्यांच्या जाळ्यात फसतात.
वृद्ध व्यक्तीनं गाडीचा दरवाजा उघडताच तो खाली वाकून पैसे पाहतो. एक माणूस त्याला पैसे उचलूनही देताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. या सगळ्या गडबडीत ड्रायव्हिंग सीटच्या बाजूचा दरवाजा एक जण हळूच उघडतो. सीटवर ठेवलेली बॅग आणि मोबाईल फोन हातचलाखीनं बाहरे काढतो आणि अलगद दरवाजा बंद करुन त्या ठिकाणाहून पसार होतो. त्यानंतर हळूहळू सगळेकडे पसार होतात. इतक्यात गाडीत बसलेल्या वृद्ध व्यक्तीला आपली बॅग आणि मोबाईल चोरीला गेल्याचं ध्यानात येते मात्र तोपर्यंत सगळे त्या ठिकाणाहून पसार झाले होते. या चोरट्यांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.