कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
विभाग प्रमुखांनी पंधरा दिवसात जिल्हास्तरावरील मागासवर्गीय तसेच दिव्यांगांचा अनुशेष निश्चित करुन अहवाल सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात जिल्ह्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बैठक झाली. या बैठकीला निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजय माने, उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील, प्रांताधिकारी वैभव नावडकर, शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य महासचिव नामदेवराव कांबळे आदी उपस्थित होते.
कास्ट्राईबचे महासचिव श्री. कांबळे यांनी विषय पत्रिकेतील विषयाच्या अनुषंगाने माहिती दिली. या मध्ये प्रमुख्याने विभाग प्रमुखांनी 14 ड हा अर्ज भरणे आवश्यक असल्याचे सांगितले. मागासर्वीय पोलीस पाटील यांचा अनुशेष भरणे, अनुकंपातत्वाखालील नियुक्ती देणे, सर्व संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करणे, डिसेंबर 2019 अखेरचा मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमध्ये तसेच सरळसेवेमधील भरतीचा अनुशेष भरणे आदींचा समावेश होता.
जिल्हाधिकारी श्री. देसाई यावेळी म्हणाले, सर्व विभाग प्रमुखांनानी विभाग निहाय जिल्हास्तरावरील माहिती तयार करावी. ज्या विभागांना भरती प्रक्रियेचे अधिकार नाही, अशा जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांनी ही माहिती वरिष्ठ कार्यालयाकडून घेवून तयार ठेवावी. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गलांडे यांनी यावेळी जिल्ह्यातील अनुकंपा सामाईक सुचिबाबत सविस्तर माहिती दिली.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.