कोल्हापूरची चिंता वाढली; शाहूवाडीत आणखी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उचत गावात आणखी एक कोरोनाग्रस्त आढळला आहे. उचत गावात एक २४ वर्षाचा युवक कोरोनो पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. आज मिरजहून आलेल्या अहवालामध्ये या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याआधीच्या बाधित युवकाच्या घराशेजारीच हा युवक रहात असून सध्या तो सीपीआरमध्ये दाखल आहे. त्याच्या संपर्कातील ८ जणांपर्यंत याआधीच प्रशासन पोहोचले असून त्यांना आता तपासणीसाठी आणले जाणार आहे. या नव्या रुग्णांच्या नोंदीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या ७ झाली आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रात दररोज करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मंगळवारी महाराष्ट्रातील रुग्णसंख्या २ हजार ६८४ इतकी होती मात्र यात आणखी भर पडून ही संख्या २ हजार ८०१वर जाऊन पोहोचली आहे. काल रात्रीपासून ११७ रुग्ण वाढले आहेत. गेल्या १२ तासात नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील ६६, पुण्यातील ४४, ठाणे ३, मीरा-भाईंदरमधील २, वसई-विरार व पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”