हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेत्यांच्या पक्षप्रवेशाचे सत्र सुरुच आहे. एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील माजी आमदार राजीव आवळे मुंबईत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित १० तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. आवळे हे कोल्हापुरातील हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार आहेत.
राजीव आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आवळेंच्या पक्षप्रवेशानंतर हातकणंगले मतदारसंघात राष्ट्रवादीचे बळ वाढण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कोण आहेत राजीव आवळे
इचलकरंजी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलेला सर्वात तरुण चेहरा अशी राजीव आवळे यांची ख्याती आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी त्यांनी पद काबीज केलं होतं. राजीव आवळे 2004 मध्ये जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. कुंभोज मतदारसंघातून त्यांच्या पत्नी स्मिता आवळे या जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. हातकणंगले मतदारसंघावर आवळेंचं वर्चस्व होतं. मात्र काही वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी राजीव आवळे यांचा गड खालसा केला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’