कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
‘मोक्का’तील आरोपीच्या बंदोबस्तात हलगर्जीपणा केल्याबद्दल सहायक फौजदारासह दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ही कारवाई केली. सहायक फौजदार भारत बारटक्के, कॉन्स्टेबल अनिल बाबासाहेब पाटील, महिला शिपाई वर्षा श्रीकांत बागडी अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
श्रीधर अर्जुन शिंगटे (रा. इंचनाळ, ता. गडहिंग्लज) असे ‘मोक्का’तील आरोपीचे नाव आहे. त्याला बुधवारी गडहिंग्लज न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले होते. चक्कर येत असल्याचे सांगून त्याने चहा देण्याीच विनंती केली होती.
यावेळी त्याच्यासोबत असलेल्या पोलिसांनी त्याला कँटीनमध्ये नेले. हात धुण्यासाठी बेड्या काढण्याची विनंती केल्यावर त्याच्या बेड्याही काढण्यात आल्या. ही संधी साधून त्याने तेथून पलायन केले आहे. आरोपीच्या बंदोबस्तात हलगर्जीपणा केल्याप्रकरणाचा ठपका ठेवत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.