कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा अधीक्षकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याची घटना कोल्हापूरच्या बिंदू चौक परिसरात घडलीय. थकबाकीदार असणाऱ्या बारागिर कुठुमबिया कडे पाणी पट्टी वसुली मोहीम राबवत असताना हा प्रकार घडलाय. बारागिर यांचे कडून अधिक्षकांसह कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गेल्या महिनाभरापासून थकबाकीदार असणाऱ्या नागरिकांकडून पाणीपट्टीची वसुली केली जात आहे. हे थकबाकीदार गेल्या अनेक वर्षापासून महापालिकेची पाणीपट्टी न भरणारे आहेत. त्यांचं पाणी कनेक्शन देखील तोडण्यात येत आहे. अशीच कारवाई आज सकाळपासून पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक प्रशांत पंडत यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील आयोध्या चित्र मंदिर परिसर , बिंदू चौक परिसर, आणि शिवाजी चौक परिसर या ठिकाणी राबण्यात आली. यावेळी बिंदू चौक परिसरातील बारगीर यांची थकबाकी गेल्या पाच वर्षांपासून थकीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पाणीपुरवठा अधीक्षकांसह त्यांच्या कर्मचाऱ्याला बारगीर कुटुंबियांनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आहे.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार जवळपास वीस मिनिटे सुरू होता. थकबाकीदार असणार्या बारगीर यांना आपण गेले पाच वर्ष थकबाकी भरली नसून आज अखेर पाणी पट्टी 40 हजार रुपये थकबाकी असल्याचे निदर्शनास आणून देखील बारगीर कुटुंबीयांनी थेट पाणीपुरवठा अधीक्षक पंडित यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की केली या प्रकारानंतर या परिसरात काही काळ वातावरण तंग झालं होतं.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.