Konkan Railway | कोकण हा भाग निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. त्यामुळे यां निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी अनेकजण येथे जाणे पसंत करतात. त्यामुळे रेल्वेच्या जाळ्याचे विस्तारिकरण करण्यासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याची मागणी केली जात आहे. हे विलिनीकरण झाल्यास कोकण स्थानकाचा तसेच परिसराचा विकास होईल असं म्हंटल जात आहे.
कोकण रेल्वेचे होणार भारतीय रेल्वेत विलिनिकरण?
कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना ही 1990 मध्ये बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर करण्यात आली होती. कोकण स्थानकाचा विकास करण्यासाठी मागच्या अनेक दिवसांपासून भारतीय रेल्वेत याचे विलिणीकरण व्हावे अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी मागील महिन्यात रेल्वे मंत्री श्री. अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्य मंत्री श्री. रावसाहेब दानवे, रेल्वे बोर्ड, अर्थमंत्री श्रीम. निर्मला सीतारामन व सर्व लोकप्रतिनिधींना पत्रं पाठवली होती. तसेच कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने भारतीय रेल्वेला निवेदन दिले आहे. त्यामुळे खरंच कोकण रेल्वेचे (Konkan Railway) विलीनिकरण भारतीय रेल्वेत होईल अशी आशा आहे.
काय होईल विलिनिकरण झाल्यास? Konkan Railway
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनिकरण झाल्यास विकासासाठी कोकण रेल्वेला निधी प्राप्त होऊ शकतो. तसेच केंद्रीय आर्थिक बजेटमध्ये स्वतंत्र आर्थिक तरतूद करून पायाभूत सुविधांची निर्मिती होवू शकते. सध्या कोकण रेल्वेचा विकास करण्यासाठी 35 हजार कोटी रुपयांची गरज पडत आहे. मात्र तेवढा निधी नसल्यामुळे हा विकास मागे पडत आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातही जोर धरतेय विलीनीकरणाची मागणी
कोकण रेल्वे (Konkan Railway) स्थानकाचा विकास करण्यासाठी रेल्वे विभागाला हवा असणारा निधी हा पुरेसा नसल्यामुळे विलीनिकरणाची मागणी केली जात आहे. अश्या विकास कामासाठी भारतीय रेल्वेच्या इतर विभागांना आर्थिक साहाय्य केले जाते. त्यामुळे याही विभागाला मदत मिळाली पाहिजे अशी मागणी जोर धरत आहेत. मोदींनी केलेल्या 2023 मधील अमृत भारत रेल्वे स्थानक विकास योजनेत कोंकण रेल्वेवरील एकाही स्थानकाचा समावेश नव्हता. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री यांच्या पुढाकाराने काही विशिष्टय स्थानकाचा बाहेरून विकास करण्यात आला. मात्र तो बाहेरील सुशोभीकरणापुरताच मर्यादित असल्यामुळे उंच फलाट, फलाटांवरील शेड, माती-चिखल विरहित फलाट यांसारखी कामे रेल्वेलाच करावी लागणार आहेत आणि कोंकण रेल्वे महामंडळ केवळ आपल्या नफ्यातून हे काम करू शकत नाही. म्हणूनच भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातही जोर धरू लागली आहे. या मागणीला कसा प्रतिसाद मिळतो आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होते की नाही हे पाहणे गरजेचे आहे.