ऑनलाईन पेमेंट करताना तुमची छोटीशी चूक पडू शकते महागात!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान हे जितके फायद्याचे आहे, तितकच त्यामुळे तोटा होतो. सध्या UPI पेमेंट आल्यामुळे बरेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने होतात. यामध्ये जरी वेळ वाचण्याचा फायदा असला तरी तुमच्या एका चुकीमुळे तुम्हाला अनेक वर्षांची पुंजी गमवावी लागते. सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे सायबर पोलीस दलाकडून सतर्क राहण्याचे आवाहन केले जात आहे. परंतु तरीही स्कॅमर हे वेगळ्या पद्धतीने लोकांची फसवणूक करत आहेत. याच फसवणूकीची शिकार बनलीये मुंबईची एक मुलगी. नेमक प्रकरण काय आहे जाणुन घेऊयात.

काय घडलं?

मुंबईची रहिवासी असलेल्या एका मुलीने ऑनलाईन फसवणूकीबाबत आपला अनुभव ट्विटरवर शेअर करत सांगितले की, “मला सगळ्यात आधी स्कॅमरने एलआयसी एजेंट म्हणून कॉल केला आणि मला सांगितलं की, माझ्या वडिलांची एलआयसी मॅच्युअर्ड झाली आहे. त्यामुळे तुम्हाला पॉलिसीचे पैसे ट्रान्सफर करावे लागेल. माझ्या वडिलांचा ऑनलाईन व्यवहार नसल्यामुळे मी त्यावर्ती विश्वास ठेवला आणि ते सांगितली त्याप्रमाणे पुढची प्रक्रिया केली. त्यानंतर मला स्कॅमरने अकाउंटला 25 हजार ट्रान्सफर करत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे 20 हजार रुपये ट्रान्सफर केले. मला पैसे मिळाल्याचा मेसेज आला होता. स्कॅमरने 5 हजार रुपये ट्रान्सफर केले, परंतु माझ्या अकाउंटमध्ये 50 हजार ट्रान्सफर झाले होते. त्यानंतर स्कॅमरनं मला सांगितलं की, त्याने चुकून 5 हजाराऐवजी 50 हजार ट्रान्सफर केले आहेत. त्यामुळे उरलेले 45 हजार रुपये परत करा असे सांगण्यात आलं. परंतु खरंतर माझ्या अकॉउंटला पैसे आलेच नव्हते. तसेच ट्रान्सफर पैश्यांचा मेसेज हा कोण्या बँकेचा नसून तो प्रायव्हेट क्रमांक होता. त्यामुळे हे सार प्रकरण माझ्या लक्षात आलं आणि माझ्यासोबत ही फसवणूक होता होता राहिली. त्यामुळे तुमच्यासोबतही असे घडत असेल तर सावध राहा ” असे तिने सांगितले.

कसे वाचाल ऑनलाईन फसवणूकीपासून?

ऑनलाईन फ्रॉड आपल्यासोबत होऊ नये यासाठी तुम्हाला येणाऱ्या अनोळखी मोबाईल क्रमांकापासून सावध राहावे लागेल. तसेच क्यूआरकोडपासून सावध राहावे लागेल. म्हणजेच   QR कोड स्कॅन करून काही सेकंदाच्या आत पैसे इतरांना सेंड होतात. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी क्यूआरकोड स्कॅन केल्यानंतर मोबाईल क्रमांक तपासूनच पैसे सेंड करावेत. अन्यथा तुमची एक चूक महागात पडू शकते.

पिन टाकू नका

सध्या ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाण वाढले असून स्कॅमर गुगलद्वारे फ्रॉड करू लागला आहे. त्यामुळे स्कॅमर क्रेडिट, डेबिट कार्डला हाताशी धरून म्हणजेच हे कार्ड ब्लॉक होईल अशी भीती दाखवून केवायसी आणि लॉटरीच्या नावाखाली पैसे पाठवत असल्याचे सांगून तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठी तुम्हाला तुमच्या कार्डचा पिन टाकायला सांगतात. आणि पिन टाकल्यास पैश्याने भरलेले तुमचे बँक अकाउंट सेकंदात रिकामे होते. तसेच तुमची आयडीही कोणत्या अनोळखी व्यक्तीला शेअर करू नका. यामधून देखील अनेक फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आली आहेत. त्यामुळे असे फोन कॉल आल्यास त्यापासून सावध राहावे. किंवा तुम्ही याची तक्रार पोलीस स्टेशन मध्येही करू शकता.

मोबाईल, लॅपटॉपचा अ‍ॅक्सेस देऊ नका

ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी आपण विविध ऍप आपल्या मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये डाउनलोड करतो. हे ऍप डाउनलोड केल्यानंतर काही गोष्टीची परवानगी येथे मागितली जाते. जर तुम्ही इतर कोणते थर्ड पार्टी ऍप वापरत असाल आणि त्यामध्ये तुम्हाला परवानगी मागितली असेल तर त्या गोष्टीबाबत सखोल माहिती घेल्याशिवाय पुढची प्रक्रिया करू नका. अन्यथा तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपचा अ‍ॅक्सेस स्कॅमरकडे जावून तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.