हॅलो महाराष्ट्र टीम । पुणे प्रशासनाने राजकीय पक्षांना भीमा-कोरेगाव येथे कोणताही कार्यक्रम आयोजित करू नये, असे सांगितले आहे. शासकीय पातळीवर सरकारकडून येथे कार्यक्रम घेण्यात येईल. पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेर्याद्वारे घटनास्थळावर नजर ठेवली जाईल. खबरदारीचा उपाय म्हणून काही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
भीमा-कोरेगाव येथे 1 जानेवारी 1818 रोजी असे काय घडले, ज्यामुळे दरवर्षी लाखो दलित बांधव या ठिकाणी येतात. अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांना त्यांचे कार्यक्रम या ठिकाणी का घ्यायचे असतात? काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास. चला पाहू या.
पेशवे आणि ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे इंग्रज यांच्यामधील झालेल्या युद्धासाठी भीमा कोरेगाव हे ठिकाण ओळखले जाते. 1817-18 मध्ये पेशवे सैन्याविरूद्ध लढताना प्राण गमावलेल्या महार रेजिमेंटच्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी भीमा कोरेगाव येथे दलित समाज मोठ्या संख्येने जमतो.या युद्धात पेशव्यांच्या सैन्याला इंग्रजांच्या हातून पराभूत व्हावे लागले होते. महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या शौर्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीने बलाढ्य अशा पेशव्यांच्या सैन्यावर विजय मिळविला. अशा परिस्थितीत हे स्थान पेशव्यांपेक्षा महारांच्या किंवा अनुसूचित जातींच्या विजयाच्या स्मारकाच्या रूपात स्थापित केले गेले.
ही लढाई फक्त मैदानातील लढाई नसून जातीयवादी पेशवाईविरुद्धची लढाई होती.
पुण्याजवळील भीमा नदीच्या काठावर त्या दिवशी जे घडले ते केवळ राजकीय आणि सामरिकदृष्टया महत्वाचे नव्हते. त्यादिवशी त्या मैदानावर फक्त ब्रिटीश आणि पेशवे लढत नव्हते, तर ही लढाई जातीयवादी मानसिकतेविरुद्ध देखील होती. या युद्धामध्ये अस्पृश्य समजल्या जाणार्या महार जातीच्या सैनिकांनी जातीयवादी पेशवाईचा कायमचा नाश केला. पेशव्यांच्या राज्यात दलितांना अतिशय हीन वागणूक देण्यात येत होती. त्यामुळे दलित लोक इंग्रजांच्या बाजूने लढत होते. या युद्धाने भारतीय समाज लोकशाही आणि समतावादी बनविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
1822 साली उभारला स्तंभ
ब्रिटिश पूर्व भारतातील 500 सैनिकांची एक छोटी तुकडी त्यातील बहुतेक सैनिक महार (दलित) होते, त्यांनी पेशवा दुसरा बाजीराव यांच्या 28,000 हजार सैन्यास अवघ्या 12 तास चाललेल्या युद्धात पराभूत केले. 1822 मध्ये कोरेगावच्या रणांगणावर विजय मिळवणाऱ्या महार सैनिकांच्या सन्मानार्थ भिमा नदीच्या काठी दगडाचा एक स्तंभ बांधला गेला होता, ज्यामध्ये त्यांची नावे कोरलेली आहेत. देशातील दलित या घटनेला त्यांच्या इतिहासाचा एक शौर्य पराक्रम मानतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही येथे येऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
1 जानेवारी 2018 रोजी काय झाले?
1 जानेवारी, 2018 रोजी, पुण्यापासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर असलेल्या भीमा-कोरेगाव येथे अनुसूचित जाती समुदायाच्या लोकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्याला काही उजव्या संघटनांनी विरोध दर्शविला होता. यानंतर हिंसाचार भडकला.