मुंबई । राज्यात संचारबंदीमुळे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. गेले अनेक दिवस विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा मुद्दा ऐरणीवर होता. या संबंधित शासनाने अंतिम निर्णय हा परीक्षा न घेता मागील एकूण गुणांवरून मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत. या विदयार्थ्यांच्या परीक्षा १५ जुलैनंतर होतील हे आता निश्चित झाले आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपालांकडून तशी परवानगी घेतली आहे.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या उन्हाळी परीक्षेचा आराखडा त्यांच्यासमोर सादर केला. यामध्ये या परीक्षा १५ जुलै नंतर घेण्यात येतील असे सांगण्यात आले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या आराखड्याला मान्यता दिली आहे.
Governor Bhagat Singh Koshyari today granted approval to the proposal of the Maharashtra University of Health Sciences to conduct all its UG and PG Summer exams from 15th July and onwards. The plan was presented to the Governor by Minister of Medical Education Amit Deshmukh.
— Governor of Maharashtra (@maha_governor) June 4, 2020
दरम्यान आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १५ जुलै नंतर घेतल्या जाणार असल्याची खात्री झाली आहे. या विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर विदयार्थ्यांना तशी माहिती देण्यात आली आहे. राज्यातील संचारबंदी बद्दल काही सांगता येणार नसले तरी सामाजिक अलगाव चे नियम पाळून या परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता आहे.