Covovax ची भारतात चाचणी सुरू, सप्टेंबरपर्यंत लस लागू होण्याची शक्यता : आदर पूनावाला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी शनिवारी सांगितले की,”भारतात Covid-19 Vaccine Covax च्या क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या आहेत.” यावर्षी सप्टेंबरपर्यंत ही लस लागू होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ऑगस्ट 2020 मध्ये अमेरिकन लस कंपनी Novax Inc. यांनी SII बरोबर लायसन्स कराराची घोषणा केली होती. नोव्हावॅक्सने आपल्या कोविड -19 ‘लस उमेदवार’ एनव्हीएक्स-सीओ 2373 च्या विकासासाठी आणि व्यापारीकरणासाठी हा करार केला आहे. ही लस भारत तसेच कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील देशांना उपलब्ध करुन दिली जाईल.

पूनावाला यांनी ट्विट केले की, “ कोव्होवॅक्सची चाचणी भारतात सुरू झाली आहे. ही लस नोव्हावॅक्स आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने विकसित केली जात आहे. आफ्रिका आणि ब्रिटनमधील कोविड -19 च्या स्ट्रेनविरुद्ध या लसीची चाचणी घेण्यात आली आहे. त्याची एकूण कार्यक्षमता 89 टक्के असल्याचे दिसून आले आहे. आम्हाला आशा आहे की सप्टेंबर 2021 पर्यंत ही लस लागू होईल. ”

तथापि, नोव्हाव्हॅक्स आणि एसआयआय दरम्यानच्या व्यावसायिक करारामध्ये उच्च-मध्यम आणि उच्च-उत्पन्न देशांचा समावेश नाही. या देशांच्या लसीवर नोव्हाव्हॅक्सचा अधिकार आहे. पूनावाला यांनी यावर्षी जानेवारीत सांगितले की, SII ला आशा आहे की,”जून 2021 पर्यंत कोव्होवॅक्स सुरू होईल.” SII आधीपासूनच भारत आणि जगातील अनेक देशांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका / ऑक्सफोर्ड कडून कोविशिल्ड ही कोविड -19 ची लस पुरवत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment