कृष्णा कारखाना निवडणूक : अविनाश मोहितेंसह मातोश्री, पत्नीही निवडणूक रिंगणात, आज 23 अर्ज दाखल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी गुरुवारी 23 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. माजी चेअरमन, संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांच्यासह त्यांच्या मातोश्री नुतन मोहिते आणि पत्नी अर्चना अविनाश मोहिते यांचाही समावेश आहे.

वडगाव हवेली – दुशेरे गटातून विंग येथील उत्तम विष्णू खबाले आणि दुशेरे येथील उत्तम तुकाराम पाटील यांनी, काले – कार्वे गटातून कार्वे येथील अमरसिंह बाळासाहेब थोरात आणि काले येथील विजय निवृत्ती पाटील यांनी, सांगली जिल्ह्यातील रेठरे हरणाक्ष – बोरगाव या गटातून रेठरे हरणाक्ष येथील जयवंत दत्तात्रय मोरे, उरूण इस्लामपूर येथील शिवाजी आप्पासाहेब पवार, बहे येथील संभाजी भगवान दमामे आणि मीनाक्षीदेवी संभाजी दमामे, बोरगाव येथील मानाजी प्रल्हाद पाटील आणि कामेरी येथील पोपट रंगराव कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

येडेमच्छिंद्र – वांगी या गटातून येडेमच्छिंद्र येथील बाबासो वसंतराव पाटील यांचा एकच उमेदवारी अर्ज आहे. रेठरे बुद्रुक – शेणोली गटातून कारखान्याचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक अविनाश जगन्नाथ मोहिते यांनी 2 तर त्यांच्या मातोश्री नुतन जगन्नाथ मोहिते यांनी एक असे तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून शिरटे येथील शिवाजी उमाजी आवळे आणि बेलवडे बुद्रूक येथील बाजीराव वाघमारे यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

महिला राखीव गटातून रेठरे बुद्रुक येथे नूतन जगन्नाथ मोहिते यांनी दोन तर अर्चना अविनाश मोहिते यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय दुशेरे येथील क्रांती तानाजी पाटील, बहे येथील मीनाक्षीदेवी संभाजी दमामे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतर मागास प्रवर्गातून विंग येथील वसंतराव बाबुराव शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती राखीव गटातून धोंडेवाडी येथील अमोल बापूराव काकडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 6  आणि आज दुसऱ्या दिवशी 23 असे आजपर्यंत एकूण 29 अर्ज दाखल झालेले आहेत.

Leave a Comment