औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी निवडणूक घ्यावी लागली ही दुर्दैवाची गोष्ट आहे. कृष्णा पाटील डोणगावकर गद्दार आहे त्यांनी आजच्या निवडणुकीत हे सिद्ध करून दाखवले, अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज दिली.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. यात अध्यक्षपदी नितीन पाटील यांची बिनविरोध काढण्यात आली, तर उपाध्यक्ष पदासाठी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अर्ज दाखल केला. त्यांची समजूत काढूनही त्यांनी अर्ज मागे न घेतल्यामुळे गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. यामध्ये सिल्लोडचे अर्जुन गाढे यांना तेरा मते मिळाली तर कृष्णा पाटील डोणगावकर यांना केवळ सात मते मिळाली.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/273541124236802
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध करायची होती मात्र कृष्णा पाटील डोणगावकर यांनी अर्ज दाखल करत निवडणूक घेण्यास भाग पाडले, यामुळे संतप्त झालेल्या सत्तार यांनी निवडणुकीनंतर प्रतिक्रिया दिली. आमचे काही लोक गद्दार निघाले आहेत आणि त्यांना या गद्दारीचे फळ भोगावेच लागणार असल्याची प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.