पाकिस्तानमध्ये जन्माष्टमीनिमित्त कृष्ण मंदिरांची तोडफोड, भाविकांवरही हल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिंध । पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील संघार जिल्ह्यातील खिप्रोमध्ये, अज्ञातांनी जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण मंदिराची तोडफोड केली. सोमवारी बदमाशांनी कृष्णाच्या मूर्तीची तोडफोड केली. जन्माष्टमीचा सण साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मंदिरातील धार्मिक समारंभादरम्यान ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. या परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. आतापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

पाकिस्तानी कार्यकर्ते वकील राहत ऑस्टिन यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील कृष्ण मंदिराची तोडफोड करण्यात आल्याचे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले. त्याचवेळी, त्यांनी सांगितले की,” हा हल्ला मंदिरात भाविक कृष्णाष्टमीची पूजा करत असताना करण्यात आला.”

या घटनेनंतर सोशल मीडियावर अशी अनेक छायाचित्रे शेअर करण्यात आली ज्यामध्ये भक्तांवर कसा हल्ला केला जात आहे हे पाहिले जाऊ शकते. हे सर्वांनाच माहित आहे की, पाकिस्तानातील सिंध प्रांतात हिंदू आणि हिंदू मंदिरांवर हल्ल्याची घटना सामान्य आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच, शेकडो लोकांनी लाहोरपासून 590 किमी अंतरावर रहिम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरात असलेल्या एका हिंदू मंदिराचे नुकसान केले.

पाकिस्तानात दरवर्षी 1000 हून अधिक मुलींचे धर्मांतर केले जाते

मानवाधिकार संघटना मूव्हमेंट फॉर सॉलिडॅरिटी अँड पीस (MSP) च्या मते, पाकिस्तानमध्ये दरवर्षी 1000 हून अधिक ख्रिश्चन आणि हिंदू महिला किंवा मुलींचे अपहरण केले जाते. त्यानंतर त्यांचे धर्मांतर केले जाते आणि इस्लामिक रीतिरिवाजांनुसार लग्न केले जाते. बहुतांश पीडित 12 ते 25 वयोगटातील आहेत.

एका अधिकृत अंदाजानुसार, 75 लाख हिंदू पाकिस्तानमध्ये राहतात, त्यापैकी बहुतेक सिंध प्रांतात आहेत. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील अल्पसंख्यांक आणि गैर-इस्लामिक धार्मिक संरचनांवरील हल्ल्यांवर अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानमध्ये अनेक मंदिरांवर हल्ले झाले, ज्यात सिंधमधील माता राणी भाटियानी मंदिर, गुरुद्वारा श्री जन्मस्थान, खैबर पख्तूनख्वाच्या कराकमधील हिंदू मंदिर. हिंदू हा पाकिस्तानातील सर्वात मोठा अल्पसंख्याक समुदाय आहे.

Leave a Comment