धक्कादायक ! स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाना, पोलिसांनी टाकला छापा

औरंगाबाद – शहरातील उस्मानपुरा भागात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांचे पितळ औरंगाबाद पोलिसांनी उघडे पाडले. शहरातील उस्मानपुरा भागात हा गैरप्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी काल संध्याकाळी 7 वाजता सदर ठिकाणावर छापा मारून कुंटणखाना चालवणाऱ्या आंटीसह एका एजंटला पोलिसांनी ताब्यात घेतले. विशेष म्हणजे ही आंटी म्हणजे 28 वर्षांची तरुणी असून मित्राच्या मदतीने स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत होती. यात 28 वर्षीय प्रियंका उर्फ अनुष्का भाऊराव इंगळे व तिचा मित्र शेख फईम शेख हुसेन याला पोलिसांनी अटक केली.

शहरातील उस्मानपुरा हा नेहमीचा वर्दळीचा भाग आहे. मात्र याच भागात एका स्पा सेंटरमध्ये हाय प्रोफाइल कुंटणखाना सुरु होता. भाजीवालाबाई पुतळ्याजवळील सिटी चॉइस स्पा सेंटरमध्ये महिलांकडून देहविक्री करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. या घटनास्थळावर छापा मारला असता तेथे दोन तरुणी देहविक्री करण्यासाठी आलेल्या होत्या. पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात पीडितेचे काम गेले होते. तिने स्पामध्ये काम सुरू केले. तेव्हा अनुष्काने तिला पैशांचे अमिष दाखवून देहविक्रीसाठी तयार केले. नंतर 22 वर्षीय तरुणीलाही जाळ्यात ओढून वेश्य व्यवसाय सुरु केला.