गुणरत्न सदावर्तेंची जीभ कापून आणणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस; पहा कोणी केलं हे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणारत्न सदावर्ते याना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या निषेधार्थ आज बारामतीत एमआयडीसी व टेक्स्टाइल पार्कच्या महिलांनी आंदोलन केले. यावेळी सदावर्ते यांची जीभ कापून आणणाऱ्याला 11 लाख रुपयांचे बक्षीस दिलं जाईल अस खळबळजनक वक्तव्य कामगार नेते तुकाराम चौधरी यांनी केले.

गुणरत्न सदावर्ते हे प्रत्येक कामगास संघटनेमध्ये हस्तक्षेप करून कामगारांना भडकवण्याचे काम करतात. पवारांच्या अस्मितेला धक्का देण्याचे काम गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते. त्या सदावर्तेची आम्ही बारामतीत वाट पाहत असून भविष्यात सदावर्तेच काय पण त्या मनोवृत्तीचे लोक बारामतीत पाऊल टाकले तर त्यांची जीभ हासडणाऱ्यास रोख स्वरूपात अकरा लाखाचे बक्षीस देण्यात येईल, असे तुकाराम चौधरी यांनी म्हटलं.

दरम्यान, शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत दगडफेक केली होती. याप्रकरणी वकील गुणारत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. सदावर्ते सध्या सातारा पोलिसांच्या कोठडीत असून त्यांची मराठा आरक्षणावरील वादग्रस्त वक्तव्या बाबत कसून चौकशी सुरू आहे.